Now Loading

कराड, सातारा

गाव विकास आराखडा तयार करताना महिलांनी आपली मते व्यक्त केली पाहिजेत... विद्याधर गायकवाड उंब्रज :ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासाकरिता महिलांनीही पुढाकार घेतला पाहिजे गाव विकास आराखडा तयार करताना महिलांनी आपली मते व्यक्त केली पाहिजेत असे प्रतिपादन यशदाचे मास्टर ट्रेनर विद्याधर गायकवाड यांनी केले. तळबीड तालुका कराड येथे सातारा जिल्हा परिषद व कराड पंचायत समितीच्या वतीने सन 2022 23 करिता गाव विकास आराखडा तयार करण्यासंबंधी तळबीड पंचायत समिती गण स्तरीय कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली या कार्यशाळेत गायकवाड बोलत होते. ग्रामीण भागाच्या विकासाकरिता शासनाकडून विविध माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असून या निधीच्या माध्यमातून पाणी आणि स्वच्छता यासह महिला वंचित घटक यांच्या विकासासाठी सुद्धा विशेष तरतूद केली जात असून या निधीचा गरजू व पात्र लोकांना लाभ मिळण्याकरीता महिलांनी गाव विकासामध्ये पुढाकार घ्यावे असे आवाहन गायकवाड यांनी केले. या कार्यशाळेस सभापती प्रणव ताटे,विस्तार अधिकारी डी एस पोतदार, तळबीड सरपंच जयवंत मोहिते, ग्रामविकास अधिकारी प्रमोद ठोके, बचत गट प्रभाग समन्वयक माधवी वनारसे यांच्यासह करवीर पंचायत समिती गण आतील सर्व सरपंच, उपसरपंच,अंगणवाडी सेविका आशा वर्कर,बचत गटातील महिला, ग्रामसेवक ग्रामस्थ संसाधन गटातील सदस्य उपस्थित होते.