Now Loading

ठाकुरदास परदेशी ने तयार केली नगर मध्ये जलदुर्ग "पद्मदुर्ग" ची प्रतिकृती ..

नगर- नगर येथील दुर्गप्रेमी ठाकुरदास परदेशी यांनी जलदुर्ग "पद्मदुर्ग "ची 10×10 फुट आकाराची प्रतिकृती साकारली आहे.प्रतिकृती मध्ये पाण्याच्या टाक्या, तोफा, सैनिकांच्या खोल्या, ईतर अवशेष,पाण्यात होड्या, मासे इत्यादी बारकावे दाखवलेले आहे. सोबत किल्ल्याची माहितीची ध्वनीफीत ही लावलेली आहे. गेल्या 10 वर्षा पासून परदेशी कुटुंबीय लोकांसाठी दिवाळी नंतर विविध किल्ल्यांची भव्य प्रतिकृती साकारतात.आता पर्यंत त्यांनी शिवनेरी, तोरणा, रायगड, राजगड, पुरंदर, प्रतापगड, सिंधुदुर्ग, सिंहगड इत्यादि किल्ल्यांची हुबेहुब प्रतिकृती साकारलेली आहे. लहाण मुलांना किल्ले बनविने करिता प्रोत्साहन मिळावा,व ईतर लोकांमध्ये किल्ले पाहण्या करीता प्रेरणा मिळावी हा या मागचा उद्देश्य असतो. पद्मदुर्ग पाहण्या साठी लोकांची गर्दी होत आहे. ही प्रतिकृती पाहण्या साठी सकाळी 9:00 ते रात्री 9:00 वा.पर्यंत सर्वासाठी रविवार दि.28/11/2021 पर्यंत खुली आहे. पत्ता-प्लॉट नं.2,"शान्तीकुंज " शांतीनगर पाण्याच्या टाकी जवळ,(सारसनगर ) अहमदनगर. संपर्क - 9860207076 (ठाकुरदास परदेशी )