Now Loading

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थींचे गोदावरी मध्ये प्रवरा संगमला विसर्जन..

पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थि काल रविवारी नगरमधील सीए ज्ञानेश्वर ऊर्फ राजेंद्र काळे यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आल्या होत्या. त्यावेळेस नगरमधील बाबासाहेबांवर प्रेम करणाऱ्या अनेक चाहत्यांनी त्यांचे दर्शन घेतले.      विश्व हिंदू परीषद जिल्हा नगर व रा. स्व. संघ दक्षिण नगर यांच्याकडून अस्थी कलशाचे दर्शन घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. या प्रसंगी रा. स्व. संघाचे प्रांत संघ चालक नानासाहेब जाधव, मा. जिल्हा संघचालक डॉ. रवीन्द्र साताळकर, जिल्हा कार्यवाह श्रीकांत जोशी, प्रांत बौद्धिक प्रमुख सचिन कुलकर्णी, निलेश लोढा, बाबासाहेब सरोदे, निलेश चिपाडे, विश्व हिंदू परीषद जिल्हा मंत्री गजेंद्र सोनावणे, जिल्हा कोषाध्यक्ष मुकुल गंधे, शहर मंत्री श्रीकांत नंदापुरकर, हरिभाऊ डोळसे, संतोष भंडारी, राम शिंदे, सीए राजेंद्र काळे, मा. नगरसेविका मनिषा बारस्कर - काळे, आयुर्वेद व्यासपिठाचे श्री.व सौ.डॉ मंदार भणगे , कुलदीप कुलकर्णी आदी उपस्थित होते.      त्यानंतर संध्याकाळी सुर्यास्ताच्या वेळेस नगरपासून जवळच असलेल्या प्रवरासंगम या पवित्र ठिकाणी अस्थिंचे विधीवत पूजन करण्यात आले. घनश्याम रसाळ गुरूजी यांनी विधिवत पूजापाठ केले. त्यानंतर एका छोट्या बोटीतून संगमाच्या मध्यभागी जाऊन  विसर्जन करण्यात आले.      याप्रसंगी मा. नगरसेविका मनिषा बारस्कर - काळे, शांताबाई काळे, नंदाताई दुसुंगे, निलेश लोढा, अशोकराव गायकवाड, राम शिंदे, मनिष बोरा, चंद्रकांत पंडित, वाकळे, आकाश दंडवते, संदिप पिंपळे, शैलेश बांगर, दत्ता आसने, बाबासाहेब चौधरी, जितेंद्र देवकर, बाळासाहेब भाकरे, सुदर्शन कुलकर्णी, आदित्य कुलकर्णी, प्रभाकर पुंडे, सुधीर दुसुंगे, इ. उपस्थित होते. याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सदस्य संजयअप्पा बारगजे, जिल्हामंत्री अनंत पांडे, गंगाराम रासने, अविनाश पंडित, गजाजन गवारे इ. ची विशेष उपस्थिती होती.