Now Loading

बागडपट्टीतील  लक्ष्मीनारायण मंदिरात देवाला लोण्याचा पोषाख व दीपोत्सव संपन्न

नगर-स्वकुळसाली हितसंवर्धक  मंडळाच्या बागडपट्टी  येथील लक्ष्मीनारायण मंदिरात दरवर्षी कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरा पौर्णिमा पर्यंत पहाटे काकड आरती उत्सव साजरा  करण्यात येते त्याची सांगता त्रिपुरारी पौर्णिमेला झाली,यानिमित्त साळी समाजातील व बागडपत्तीतील महिला वर्गाने एकत्र येऊन दरवर्षी प्रमाणे  लक्ष्मीनारायण मूर्तीना  लोण्याचा पोशाख तयार केला तर सायंकाळी आकर्षक रांगोळी काढून दीपोत्सव साजरा करण्यात आला                          यावेळी मोठ्या संख्येने समाज बंधू भगिनी व परिसरातील महिला उपस्थित होत्या हा  कार्यक्रम वृत्तपत्र विक्रेते सुभाष डफळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला याप्रसंगी ट्रस्टचे चेअरमन अरविंद धिरडे,साळी समाजाचे जिल्हा संघटक महेश कांबळे,बाबा वैद्य,कृष्णा बागडे ,अरुण तरोटे,संजय सांगावकर,गजेंद्र सोनवणे,वंदना क्यादर, वनिता पाटेकर,मंजुळा क्यादर, अर्चना सोनसाळे,रेणुका बोगम,अस्मिता रच्चा,चंद्रकला पेंद्राम,रेणुका गोसके, निशा कोटा,आशा कांबळे, पुष्पा वन्नम,मनीषा चांगटे,रोहिणी क्यादर,पद्मा  क्यादर ,लता डफळ,निशा तरटे,अश्विनी सब्बन,उषा पाठक,लीलावती अडसूळ,अहिल्या कोदे,पुष्पा डफळ,मंगल कनोरे,मीरा रच्चा, गीता कोटा,लीला पागा आदी उपस्थित होते                       तसेच पाडव्यानिमित्त भजनाचा कार्यक्रम करून संपन्न होऊन अन्नकोट करून सर्वांना प्रसाद वाटण्यात आला