Now Loading

रामप्रसाद बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन, मेघना बोर्डीकर.

जिंतूर दि 23 नोव्हेंबर; जिंतूर विधानसभा माजी आमदार तथा भाजप नेते रामप्रसाद बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त दि 24 नोव्हेंबर2021 रोजी मोफ़त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आ. मेघना साकोरे बोर्डीकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे.या कार्यक्रमाचे आयोजन दीपस्तंभ प्रतिष्ठान यांनी केले आहे, सेलू तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी 9 ते 5 या वेळेत हें शिबिर होणार असून मोतीबिंदू तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिक यांनी या शिबिरात सहभाग नोंदवावा असं आवाहन आ. बोर्डीकर यांनी केले आहे.