Now Loading

केजमध्ये एमआयएमची शहर कार्यकारणी जाहीर

केजमध्ये एमआयएमची शहर कार्यकारणी जाहिर केज (बीड)- येणाऱ्या नगरपंचायत निवडणूक समोर ठेऊन एम आय एम पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी एम आय एमची कार्यकर्णी जाहीर केली. केज येथे काल शासकीय विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत एम आय एमचे जिल्हाध्यक्ष अॅड. शफीक शेख तसेच शहर अध्यक्ष तालेब ईनामदार यांच्या मार्गदर्शना खाली बैठक पार पडली. एमआयएमचे जिल्हाध्यक्ष अॅड. शफीक शेख यांच्या हस्ते विविध पदाचे वाटप करण्यात आले. साबेर इनामदार (युवा शहर अध्यक्ष), सय्यद दस्तगीर = (शहर उपाअध्यक्ष), फेरोज पठाण (कामगार संघटना अध्यक्ष), सद्दाम शेख (चिंचोलि सर्कल प्रमुख), समीर शेख (चिंचोलि सर्कल उपाध्यक्ष), इमाद फारुकी (शहर उपअध्यक्ष), उजेफ तांबोली (सोशलमीडिया शहर अध्यक्ष), अलीम शेख (युसुफ वडगाव सर्कल प्रमुख), सोहेल सय्यद (सोशल मीडिया केज तालुका अध्यक्ष), शकील शेख, अश्फाक सय्यद, सञ्जाद शेख, नाजेम शेख, आमेर तांबोली, समीर शेख (सदस्य), यावेळी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.