Now Loading

माजलगाव गेवराई तालुका प्रगतिशील लेखक संघाची कार्यकारिणी नुकतीच गठीत करण्यात आली. अॅड. सुभाष निकम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. संघटनेच्या अध्यक्षपदी साहित्यिक प्रकाश भुते यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. या बैठकीसाठी प्रगतिशील लेखक संघाचे राज्य सहसचिव डॉ. समाधान इंगळे, जिल्हाध्यक्ष राजकुमार कदम, उपाध्यक्ष प्रा. शरद सदाफुले, रमेश गायकवाड, कोषाध्यक्ष अभिमान खरसाडे, कवी पंजाब येडे, डी. जी. तांदळे यांची उपस्थिती होती. तालुका कार्यकारिणीची निवड पुढीलप्रमाणे करण्यात आली. अध्यक्षपदी प्रकाश भुते, उपाध्यक्ष विष्णुप्रसाद खेत्रे, रंजना सोनवणे, सय्यद मुज्तबा, सचिवपदी धर्मराज करपे यांची तर सहसचिव म्हणून अशोक निकाळजे आणि पल्लवी माळी यांची निवड झाली. कोषाध्यक्ष पदी संतोष प्रधान, सहकोषाध्यक्ष बसंत केदार, तालुका संघटक म्हणून परमेश्वर शिंदे हे काम पाहणार आहे. सुकाणू समितीचे प्रमुख म्हणून अॅड. सुभाष निकम तर सदस्य म्हणून प्रा. राजेंद्र बरकसे, डॉ. बापू घोक्षे, शाहीर विलास सोनवणे, डॉ. सदाशिव सरकटे, डॉ. न. पु. काळे, प्रशांत रुईकर, सुभाष सुतार, तात्यासाहेब मेघारे, संतोष गर्जे, धनजय सुलाखे, माधव चाटे, प्रा. शरद सदाफुले, विष्णू खेत्रे, डॉ कृष्णा वैद्य यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी तालुका कार्यकारिणीचे सदस्यपदी जगन्नाथ जाधव, सुरेखा येवले, रंगीब इनामदार, सुरेश तळेकर, संतोष कोठेकर, सविता ढाकणे, शिल्पा वाघमारे, रुद्राक्ष कदम, संतोष गायकवाड, शोभा दळवी, प्रा. शत्रुघ्न जोगदंड, पूजा काळे, जितेंद्र सुतार, प्रा. गणेश टकले आदींची निवड करण्यात आली.