Now Loading

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये स्वच्छता उपक्रम्

धुळे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा २ अंतर्गत उद्या दिनांक २३ नोव्हेंबर २०२१ रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये स्वच्छतेचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती धुळे जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. एम. देवरे यांनी दिली. दिनांक १९ नोव्हेंबर २०२१ ते २३ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून वैयक्तिक, सार्वजनिक, शाळा ,अंगणवाडीमधील शौचालयांचा शाश्वत वापर, योग्य देखभाल व दुरुस्ती आणि अनुषंगिक सुविधांच्या उपलब्धतेच्या अनुषंगाने पूरक ठरणारे विविध उपक्रम राबविण्याबाबत शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वानमथी सी. यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या दिनांक २३ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील गावांमधील शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये स्वच्छतेचा उपक्रम राबविण्यात येईल. यासाठी सर्व गटशिक्षणाधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, आणि ग्रामसेवकांना सूचना देण्यात आल्या आहेत .प्रत्येक गावातील शाळा आणि अंगणवाडी मधील शौचालय स्वच्छ आणि वापरा योग्य राहील या दृष्टीने नियोजन करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.  जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून दिनांक १९ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर दरम्यान विविध उपक्रम राबविण्यात येत असून यापूर्वी गावात कुटुंबस्तर शौचालय, परिसर स्वच्छता तसेच हात धुवा प्रात्यक्षिक, शोष खड्डा बांधकाम आदि उपक्रम घेण्यात आले. उद्या दिनांक २३ नोव्हेंबर रोजी शाळा आणि अंगणवाडी स्वच्छतेचा उपक्रम शिक्षक, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवकांनी देखील योग्य पद्धतीने राबवावा असे आवाहन पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवरे यांनी कले