Now Loading

१५ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या 'बोधचिन्हाचे अनावरण

नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या हस्ते करण्यात आले.के. टी. एच. एम .महाविद्याल याच्या प्रांगणात ४ आणि ५ डिसेंबरला हे संमेलन होणार आहे. त्यासाठीचे बोधचिन्ह औरंगाबाद येथील चित्रकार राजानंद सुरडकर यांनी तयार केले आहे. या बोधचिन्हाच्या अनावरण समारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संमेलनाचे स्वागताध्यक्ष शशीकांत उन्हवणे, मुख्य संयोजक कॉ.राजु देसले, मुख्य विश्वस्त अॅड.मनिष बस्ते, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कॉ.किशोर ढमाले, माजी उपमहापौर गुलाम शेख आदि उपस्थित होते