Now Loading

नाशिकमध्ये होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सुप्रसिद्ध विज्ञान साहित्यिक आणि खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर भूषविणार आहेत.

नाशिकमध्ये होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सुप्रसिद्ध विज्ञान साहित्यिक आणि खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर भूषविणार आहेत. संमेलनाच्या इतिहासात प्रथमच एका विज्ञान साहित्यिकाची अध्यक्षपदी निवड झाली आहे. यानिमित्ताने लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेट, सीओईपी माजी विद्यार्थी संघटना आणि ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन समिती यांच्या वतीने विज्ञान साहित्यावर एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. परिसंवाद "मराठीतील विज्ञान साहित्य: परंपरा, सामाजिक संदर्भ आणि महत्व" या विषयावर होणार असून तो शनिवार दि. २७ नोव्हेंबर २०२१ रोजी संध्याकाळी ठीक ६ वाजता आयोजित केला आहे. नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह श्री. अ. पां. देशपांडे आणि पुणे विद्यापीठा तील भौतिकशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ. संजय ढोले यांना या परिसंवादात वक्ते म्हणून आमंत्रित केले आहे. हे तिन्ही मान्यवर वक्ते ज्येष्ठ विज्ञान लेखक आहेत. या परिसंवादाचे सूत्रसंचालन डॉ.गिरीश पिंपळे हे करणार आहेत. हा कार्यक्रम नाशिक मधील महाकवी कालिदास कलामंदिर, शालिमार, नाशिक येथे होणार असून त्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे . तसेच रविवार दि. २८ नोव्हेंबर २०२१ रोजी सांयकाळी ६ वाजता कवयित्री शांताबाई शेळके जन्मशताब्दी आणि वसंत बापट जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या कवितांचा तसेच सुमधुर गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. दि. ३० नोव्हेंबर २०२१ रोजी सांयकाळी ६ वाजता समेलनपूर्व काव्योत्सव प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकमधील प्रसिद्ध कवींच्या सहभागात होणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी अरुण म्हात्रे करणार आहेत. हे दोन्हीही कार्यक्रम महाकवी कालीदास कलामंदिर, नाशिक येथे होणार आहे