Now Loading

१२ तासात खुनाच्या गुन्हयातील आरोपीतांच्या मुसक्या आवळल्या

नाशिक- पंचवटी परिसरातील म्हसरुळ पोलीस स्टेशन हददीत २१/११/२००४ सायंकाळी दरम्यान म्हसरूळ गाव स्मशानभुमीच्या पुढे आडगाव रस्त्यावर हॉटेल रोहीनी समोरील शेतात पडलेले प्लॉटवर फिर्यादी अशोक रामनाथ धात्रक रा. उमराळे बुदुक ता. दिंडोरी जि. नाशिक भाचा प्रविण गणपत काकड यास त्याचे मित्र स्वप्नील पाटील व इतर दोन पैकी एक इसम ज्याचे नाव संदीप उर्फ लेप्टर त्रिभुवन त्याने पांढरा शर्ट चेक्स शर्ट होता व दुसरा त्याचा सहकारी लाल टी-शर्ट घातलेला इसम त्याचा चेहरा पाहीलेला आहे त्यांनी संगणमत करून पूर्व वैमनस्यातून त्यास दारू पाजुन, शेतात नेवून त्याचेवर कोयत्याने वार त्यास गंभीर दुखी करून डोके फोडून जागीच जिवे ठार केले आहे. यात म्हसरुळ पोलीस ठाणे गुन २५७/२०२१ भा.द.वि. कलम ३०२,३४ सहभा.ह.का.क. ८/२५ प्रमाण दि.२२/११/२०२१ रोजी दाखल आहे. सदर गुन्हयाचे घटनेची माहीती मिळताच मा. सहा पोलीस आयुक्त सा विभाग - १ मधुकर गावीत सो महसरुळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारतकुमार सूर्यवंशी, सपोनि / विनायक आहीरे सपोनि सुधिर पाटील आपले स्टाफसह घटनेची ठिकाणी रवाना होवुन घटना स्थळाची पाहणी करून वरिष्ठांना त्याबाबत माहीती दिली. घटना स्थळी पोलीस उप आयुक्त सो. परिमंडळ-२ विजय खरात यांनी घटनास्थळी भेट देवून पाहाणी केली. व तपासकामी मार्गदर्शक सुचना दिल्या. आणि घटनास्थळी फॉरेन्सीकचे पथक यांना पाचारण कर भौतिक पुरावे गोळा करण्यात आले व प्रेत पोस्टमार्टम कामी रवाना केले. यातील मयत प्रविण गणपत काकड वय २४ ग. गुलमोहर नगर म्हसरूळ नाशिक हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुद्ध पंचवटी, म्हसरुळ पोलीस स्टेशन येथे शरीराविरुध्द विविध गुन्हे दाखल आहे त्याचेवर यापूर्वी एमपीडीए अंतर्गत १या करीता स्थानबयध्दतेची कारवाई करण्यात आलेली होती. तो ११ दिवसापूर्वी म्हसरुळ पोलीस स्टेशनकडील भा द वि क ३५३ वे गुन्हयातुन जामीनावर नाशिक रोड कारागृह येथून सुटला होता. तसेच यातील आरोपी १/ संदीप उर्फ लेप्टर सुरेश त्रिभुवन वय ३२ धंदा रिक्षा चालक रा. म्हसरुळ राजवाडा, दिंडोरी रोड नाशिक याचे विरुध्द यापूर्वीच पंचवटी पोलीस स्टेशन नाशिक येथे शरीराविरुध्द व किडनपाँगचे गुन्हे दाखल आहेत. २८ महेंद्र उर्फ विरु सुरेश अभंग वय ३० धंदा पेटीगकाम रा.आंबेडकर नगर, दिंडोरी रोड नाशिक याचे विरुद्ध पंचवटी पोलीस स्टेशनला शरीराविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. ३/ स्वप्नील दत्तात्रय पाटील वय ३२ वर्ष धंदा- शुज मार्ट, रा. प्लॉट नं. ५८ विजय प्राईड अपार्टमेंट समोर, रामकृष्ण नगर, मखमलाबाद नाशिक याचे विरुद्ध गुन्हे दाखल नाहीत. पोलीस आयुक्त दिपक पान्डेय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप आयुक्त अमोल तांबे, विजय खरात, सहा पोलीस आयुका वि १ मधुकर गावीन यांनी दिलेल्या मार्गदर्शक सुचना नुसार महसूळ पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व अमलदार, पोना/ गणेश रहेर पोना / दिनेश गुबाई यांचे गुप्त बातमीवरून सपोनि / सुधिर पाटील पोहवा / विष्णु हळद पोकों/ प्रशांत देवरे, पोका गठोड यांनी यातील आरोपी नं. १ व आरोपी नं. २ हे गुन्हा करून फरार झाले होते. मोबाईल स्टोकेशनव्दारे गुन्हयातील आरोपीताचा माग काढून आज दिनांक २२/११/२०२२ रोजी आडगाव ते ओझर मार्गावरून ताब्यात घेतले आहे. तसेच आरोपीतानी गुन्हयात वापरलेली मोटार सायकल हस्तगत करण्यात आलेले आहे. आरोपीतांना गुन्हा करताना त्यांचे हातावर पंज्यावर तिक्ष्ण हत्याराने जखमा झाल्याने त्यांना वैदयकीय तपासणी करीता शासकीय रुग्णालयत येथे पाठवून गुन्हयान अटक करण्यात आलेली आहे तसेच आरोपी नं.३ स्वप्नील दत्तात्रय पाटील हा सुध्दा एका खाजगी दवाखान्यान हाताला मार लागल्याने उपचार घेत असता त्यास ताब्यात घेवून वैदयकीय तपासणी करून गुन्हयात अटक केली आहे. पोलीस ठाणे म्हसरुळ येथील वरील अधिकारी अमलदार यांनी सदर गुन्हयाया सखोल तपास करुन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली १२ तासाचे आत कसशिने व शिताफिले करुन गुन्हयातील फरार आरोपीताना जेरबंद करून अटक केली आहे. व गुन्हा उघडकीस आणला आहे. गुन्हयाचा सविस्तर तपास वपोनि भारतकुमार सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाको सपोनि / विनायक आहीरे व पोकों/ गायकवाड हे करीत आहेत.