Now Loading

आ. राहुल पाटील यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचं उद्घाटन.

परभणी दि 23 नोव्हेंबर; परभणी विधानसभा मतदार संघातील राहा टी येथील रस्त्याच्या कामाचे उद्घाटन आ राहूल पाटील यांच्या हस्ते आज सकाळी11 वाजता करण्यात आले, राष्ट्रीय महामार्ग 222 पासून जवळ असलेल्या राहती येथे 53.51 दशलक्ष रु निधी या कामाला मिळाला असल्याची माहिती आ. राहूल पाटील यांनी बोलताना दिली आहे. यावेळी ग्रामस्थ मंडळींच्या वतीने राहूल पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. गावच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.