Now Loading

महिलांचे गळ्यातील सोन्याच्या पोत चोरी करणारा चैनस्नॅचर त्यांच्या साथीदारांसह अटक

गुन्हेशाखा युनिट क्र. १ ची कामगिरी नाशिक शहरामध्ये मोटार सायकलवरून जाणा-या महिलांचे गळ्यातील सोन्याच्या चैन/पोत जबरीने ओडून स्नॅचिंग करण्याचे प्रकार घडत असल्याने पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय्. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्रीमती पौर्णिमा चौगुले-श्रींग, सहा. पोलीस आयुक्त वसंत मोरे सोो. यांनी अशा प्रकारचे गुन्हे करणारे आरोपीतां बाबत माहिती काढून त्यांना जेरबंद करणे बाबत गुन्हेशाखेस सक्त सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने चैन स्नॅचिंग करणारे आरोपीता बाबत माहिती काढून उपनगर पोलीस स्टेशन कडील गुरतं. १७८/२०२९ भादविक ३७९,३४ या गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना, उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत कदम मळा येथून मोटार सायकलवरुन जाणा-या महिलेच्या गळयातील सोन्याची चैन/ पोत जबरीने ओढून चैन स्नॉचंग केल्याचा प्रकार पडला होता. सदर घटने बाबम उपनगर पोलीस स्टेशन येथे गुरनं. २२९/२०२१ भादविक ३९२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवून त्याचे फुटेज प्राप्त करून फुटेज द्वारे आरोपीची ओळखण्याचा प्रयत्न करीत असतांना गुन्हेशाखा युनिट क्र. १ नाशिक शहर कडील पोलीस अंमलदार रविंद्र बागुल यांना गुप्त बातमीदार यांचेकडुन | ओळख पटली. त्यांना सदरचा चैन स्नैचिंग करणारा आरोपी हा पंचवटीतील गणेशवाडी परिसरातील पर्योगस्टेशन मधील साईबाबा मंदिरा समोर येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्यांनी सदरची बातमी वपोनिरी. विजय हमाळ यांना कळवून त्यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी महेश कुलकर्णी, पोलीस अंमलदार रविंद्र बागुल, नाझीम पठाण, प्रदीप म्हसदे, योगीराज गायकवाड, विशाल देवरे अशांनी आरोपी नाम सईद आसमोहमद सैय्यद उर्फ छोटया वय २९, रा. वय २९, रा. अनाहत सोसायटी रो हाऊस नंवर २, दर्गा जवळ, पखालरोड, नाशिक यास ताब्यात घेतले. त्याचेकडेस गुन्हयासंबंधाने चौकशी केली असता त्याने प्रथम उपनगर पो.स्टे. कडीला गुग्नं २२९/२०२१ भादविक ३९२ या गुन्हयाची कबुली दिली. त्या बाबत पोलीसांनी त्याचेकडुन गुन्हयातील महिलेचे जबरी चोरी केलेले सोन्याचे मंगळसूत्र १७ ग्रॅम वजनाचे रुपये ७३,००० /- किंमतीचे व गुन्हयात वापरलेली पल्सर मोटार सायकल किंमत रुपये ८०,०००/- ची असा एकूण १,५३,००० /- किंमतीचा माल हस्तगत केला, नमुद आरोपीताकडे अधिक विचारपूस करता त्याने उपनगर, मुंबईनाका, गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याचेकडुन १) उपनगर पोलीस स्टेशन कडीला गुरनं. १७८/२०२१ भादविक ३९२,३४२) गंगापुर पोलीस स्टेशन गुरनं २०९/२०२१ भादविक ३९२, ३) मुंबईनाका पोलीस स्टेशन गुरनं २८८/२०२१ भादविक ३९२ प्रमाणे गुन्हयांची उकल करण्यात आली. त्यापैकी उपनगर पोलीस स्टेशन कडील गुरनं. २२९/२०२१ भादविक ३९२,३४ हा गुन्हा त्याचा साथीदार नामे आफताब नजीर शेख याचे सोबत केल्याचे उघडकीस आल्याने त्यास देखील ताब्यात घेण्यात आले. तसेच नमुद आरोपीतांकडे वरील नमुद गुन्हयातील जबरीने चोरी केलेल्या सोन्याचे दागिन्यांबाबत चौकशी केली असता त्यांनी सदरचे सोन्याचे दागिने त्याचा मित्र अजय सिंग याचे मार्फतीने सोनार नामे विशाल दुसाने यास विक्री केल्याचे सांगीतलेने त्यांना देखील चौकशी कामी ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर सदर चारही इसमांना पुढील कारवाई करता, उपनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. अशा प्रकारे नमुद्र आरोपीतांकडुन वरील नमुद चैन स्नॅचिंगचे एकुण ०४ गुन्हे उघडकीस आलेले आहेत. सदरची कामगिरी दीपक पाण्डेय् सो.पोलीस उपायुक्त नाशिक, श्रीमती पौर्णिमा चौगुले-श्रींगी , पोलीस उप आयुक्त गुन्हेशाखा नाशिक शहर, वसंत मोरे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हेशाखा, नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेचे व पो. निरी. विजय ढमाळ, सपोनिरी, महेश कुलकर्णी, दिनेश खैरनार, पोउपनिरी, विष्णु उगले जाकीर शेख, पोलीस अंमलदार रविंद्र बागुल, नाझीम पठाण, प्रदीप म्हसदे, योगीराज गायकवाड, विशाल देवरे, असिफ तांबोळी, प्रतिभा पोखरकर गुन्हेशाखा युनिट क्रमांक १ कडील इतर सर्व पोलीस अंमलदार यांनी संयुक्तीक रित्या केलेली आहे.