Now Loading

विनापरवानगी बॅनर लावणाऱ्या नगरसेवक व प्रिटिंग करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल 

नाशिक - परवानगीशिवाय बॅनर लावण्यास पोलीस आयुक्तांनी मनाई केली असतानाही परस्पर होर्डिंग्ज लावणाऱ्या नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांच्यासह प्रिटिंग करणाऱ्याविरुद्ध अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. नगरसेवक सूर्यवंशी यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन व प्रभागातील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळाचे परिसरात बॅनर लावण्यात आले होते नगरसेवक सूर्यवंशी यांनी पाथर्डीफाटा ते शुभम पार्क या मार्गावरील डिव्हायडरवर असलेल्या पथदीपांवर ठिकठिकाणी ६० बॅनर लावले होते. त्यासाठी पोलीस आयुक्तांची परवानगी घेण्यात आलेली नाही. असे असतानाही सूर्यवंशी यांनी सटाण्यातील राहुल प्रिंटर्सचे यांच्याकडून हे बॅनर्स छापून घेतल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी नगरसेवक सूर्यवंशी यांच्यासह संचालक राहुल आहेर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.