Now Loading

'आझादी काअमृतमहोत्सव' उपक्रमाचा समारोप कार्यक्रम २८ रोजी

बारामती:-बारामती शहरातील कविवर्य मोरोपंत नाट्यगृह प्रशासकीय भवन समोर येथे दि.२८ रोजी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश भालेराव व बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड चंद्रकांत सोकटे यांच्या पुढाकाराने तसेच बारामतीत वकील संघटना व विधी सेवा समितीकडून 'आझादी काअमृतमहोत्सव' उपक्रमाचा समारोप कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीं उपस्थित राहणार आहेत. 'आझादीका अमृतमहोत्सव' निमित्त विधी सेवा समिती व वकील संघटनेकडून कायदेविषयक शिबिरे,पथनाट्ये आदी माध्यमांतून जनजागृती करण्यात आली. बारामतीतील न्यायाधीश वर्गानेही या उपक्रमात भाग घेतला होता. समारोपाच्या निमित्ताने शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे स्टॉल नाट्यगृहाबाहेर लावले जाणार आहेत. शासनाच्या विविध विभागांच्या योजनांची माहिती दिली जाणार असून मार्गदर्शन केले जाणार आहे. विधी सेवा समितीमार्फत गरजू लोकांसाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या निर्देशांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना दिली जाणार आहे. शासनाच्या विविध खात्यांच्या सेवा व त्याच ठिकाणी सुविधा तत्काळ पुरविल्या जाणार आहेत. तरी गरजूंनी या सर्व सेवा सुविधांचा लाभ घेण्यासाठी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.