Now Loading

शरद पवार-राहुल गांधी जवाब दो, शिवसेना सेक्युलारीझम कैसी ? असदुद्दीन ओवेसी यांचा थेट सवाल ; सर्व दृष्टया सबल असलेल्या मराठा समाजाला आरक्षण का?

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे राष्ट्रीय नेते खासदार असदुद्दीन ओवेसी हे मंगळवारी सोलापूर दौऱ्यावर होते, यांच्या उपस्थितीत हुतात्मा स्मृती मंदिरात कार्यकर्ता मेळावा झाला. संपूर्ण सभागृह खचाखच भरले होते यावेळी सर्वांच्या नजरा या ओवेसी यांच्या भाषणाकडे लागल्या होत्या. महाराष्ट्रात आलेल्या तीन पक्षाच्या महाविकास आघाडी सरकारवर ओवेसी यांनी हल्लाबोल केला. कायम एमआयएम पक्षाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे भाजपची बी टीम म्हणून संबोधतात मात्र हिंदुत्ववादी असलेल्या शिवसेनेसोबत या दोन्ही पक्षांनी आघाडी करून सेक्युलारिझम जमिनीत गाडले असा थेट आरोप त्यांनी करत शरद पवार आणि राहुल गांधी यांनी सांगावं शिवसेना सेक्युलारिझम कशी? असा प्रश्न उपस्थित केला. त्यांनी आपल्या भाषणात केवळ मुस्लिम आरक्षणाचा प्रमुख मुद्दा उपस्थित केला. महाराष्ट्रातील मराठा समाज आणि मुस्लिम समाजाची तुलना सर्वच बाबतीत केली ती आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक या सर्व बाबतीत त्यांनी आकडेवारी दाखवली सर्वच क्षेत्रात मराठा समाज अग्रेसर असताना त्यांना आरक्षण का देता असा सवाल करत मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे असे ठोसपणे सांगितले. काय म्हणाले पहा हा व्हिडीओ....