Now Loading

अकोला जिल्ह्यात कोणत्या निवडणुकांचा ज्वर?

अकोला: अकोला जिल्ह्यात सध्या अनेक निवडणुकांचे वारे वाहत आहे.जिल्हा परिषदेच्या पोट निवडणुका आटोपल्यावर सभापती,उपसभापतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडला त्यात आता जवळपास दीडशेहून अधिक ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला, शिवाय विधान परिषद निवडणूक जाहीर झाली आहेच, यासाठी शिवसेनेचे गोपीकिसन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिवाय अकोला महानगरपालिका निवडणुकांचा बिगुल देखील वाजला आहे, त्यासाठी फेब्रुवारीत मतदान होणार आहे प्रशासनाने प्रभाग रचना तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली असून या सर्व निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत.