Now Loading

पाईप मोरी / पुलावर कठडे  , पथदिवे  बसवावे व दुरुस्ती करावी : मी धुळेकर

धुळे ;  काही वर्षांपूर्वी कालिका माता मंदिर ते देवपूर व मोगलाई ते देवपूर ला जोडणाऱ्या अशा दोन पाईप मोऱ्या  बसवण्यात आल्या होत्या . या दोन्ही पाईप मोऱ्यांचा नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो . पावसाळ्यात या दोन्ही पाईप मोरींवरून खूपदा पाणी जाते तसेच या मोरीवरून चार चाकी वाहनांचीही बऱ्यापैकी वाहतूक आहे .             त्यामुळे दोन्ही मोरींची अवस्था अधिकच खराब झाली आहे . सुरवातीपासूनच या दोन्ही पाईप मोऱ्यांवर कठडे बसवण्यात आलेले नाहीत . ज्याने वाहन किंवा नागरिक पडण्याचा धोका निर्माण होऊ शकतो . या दोन्ही पाईप मोर्यांचा वापर रात्री बेरात्री सुद्धा बऱ्यापैकी केला जातो . म्हणून त्या ठिकाणी पथदिवे बसविणे सुद्धा गरजेचे आहे .                तरी आपणास नम्र विनंती कि , कालिका माता मंदिर व मोगलाई पाईप मोरी पुलावर कठडे व पथदिवे बसविण्यात यावे तसेच त्याची दुरुस्ती सुद्धा लवकरात लवकर करावी ही नम्र विनंती .              त्याजोगे भविष्यात होऊ शकणारे अपघात , मोठया हानी टाळल्या जातील . अशी मागणी मी धुळेकर संघटने तर्फे मा. उपजिल्हाधिकारी सो . श्री अंतुर्लीकर साहेब याना निवेदन देऊन करण्यात आली .               यावेळेस मी धुळेकर चे अध्यक्ष - निरंजन भतवाल , दिनेश वाघ , रफिक शेख, छोटू पोतदार , विशाल गायकवाड , गोपाल पाटील , पुष्पक अटवाल , लोकेश संचेती उपस्थित होते .