Now Loading

ब्रेकींग : सोलापूर : वडवळ पाटी येथे भरधाव ट्रकच्या धडकेत पती-पत्नीचा जागीच मृत्यू

"मृत अर्जुन नामदेव थिटे हे निवृत्त एस आर पी कर्मचारी असुन त्यांना उत्कृष्ठ कामगिरी बध्दत राष्ट्रपती पदक मिळाले होते .मृत अर्जुन थिटे यांना एक मुलगा , सुन व दोन मुली आहेत" . मोहोळ ,ता.23 : तालुक्यातील वडवळपाटी येथे कोळेगांव हद्दीत सोलापूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या मालट्रकने मोटारसायकलला पाठीमागुन जोराने धडक दिल्याने मोटारसायकलवरील वृद्ध पती -पत्नीचा जागीच मृत्यु झाल्याची घटना मंगळवार रोजी भर दुपारी सव्वा एकच्या दरम्यान घडली . याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मुळगांव कोंबडवाडी येथील मयत अर्जुन नामदेव थिटे व अनिता थिटे हे दोघेही सध्या सोरेगांव येथे राहण्यास असुन ते शेतीच्या कामानिमीत्त मुळ गांव कोंबडवाडी येथे गावी आले होते . शेतीची व अन्य कामे उरकुन परत ते मोटार सायकल ( एम .एच.13 AK 7332 क्रंमाक ) वरुन परत जात असताना मोहोळहुन सोलापूर कडे जाणाऱ्या मालट्रकने ( क्रंमाक ए .पी .39 V 6829 ) पाठीमागुन जोराने धडक दिल्याने मोटार सायकल वरील अर्जुन नामदेव थिटे ( वय ६५ ) व अनिता थिटे ( वय ६० ) हे दोघे पती पत्नीचा जागीच मृत्यु झाला . घटनास्थळावर मृतदेहाचे मेंदुचे तुकडे अत्यावस्त विखुरल्याने अतिशय भयानक चित्र दिसत होते . याबाबतची खबर पोलीसांना मयताचे पुतणे सचिन शंकर थिटे यांनी पोलीसांना दिली असुन मालट्रकच्या चालकास अटक करण्यात आली आहे . अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार विजय माने करीत आहेत .