Now Loading

मुस्लिम समाजाला कोर्टाने मान्यता दिलेलं 5% आरक्षण तत्काळ लागू करण्यात यावं. सामाजिक भावना भड कावणाऱ्या समाजकंटकांना वंचित बहुजन आघाडी ने शासनाला सुपूर्द केलेलं मोहंमद पैगंबर बिल येणाऱ्या अधिवेशनात मंजूर करून तत्काळ लागु करावं. सारथी बार्टी प्रमाणे मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यासाठी प्रशिक्षण संकुल उभारण्यात यावेत. वक्त बोर्डाच्या जागेवर केलेले अतिक्रमण तत्काळ हटवून मुस्लिम समाजाच्या उनत्ती साठी त्या जागेचा वापर करावा अश्या मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडी धारूर तालुक्याच्या वतीने तहसील कार्यालय वरती निदर्शने करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडी धारूर तालुकाध्यक्ष इंजि.प्रशांत उघडे शहराध्यक्ष आकाश गायसमुद्रे ,महासचिव अहमद शेख,मौलाना पठाण सहाब मौलाना शेख सहाब ,अभिजित ओव्हाळ, रानु उजगरे, ऋषी उघडे,अतुल उघडे,धीरज गाय समुद्रे,उपस्थित होते. या आंदोलन MIM चे तालुकाध्यक्ष पठाण सहाब,मुबिन सहाब यांनी पाठिंबा दिला