Now Loading

थकीत विमा शेतकरी यांच्या खात्यात वर्ग करावा, आ. गुट्टे यांचे कृषी मंत्री यांना निवेदन सादर.

परभणी दि 23 नोव्हेंबर: गंगाखेड तालुक्यातील पिंपळ दरी महसूल मंडळ आणी सोनपेठ तालुक्यातील शेळगाव महसूल मंडळास खरीप हंगाम2020 मधील मंजूर असलेला पीक विमा तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग करावा अशी मागणी करणारे निवेदन गंगाखेड विधानसभा आ, रत्नाकर गुट्टे यांनी आज दि 23 नोव्हेंबर रोजी कृषी मंत्री दादाजी भूसे यांना सादर केले. पीक विमा कंपनी यांच्या कडे पिंपळदरी आणि शेळगाव महसूल मंडळाचा सोयाबीन पिकाचा, तर पालम तालुक्याचा तूर पीक विमा राज्य शासन आणि कंपनी यांच्या कडे थकीत आहे.