Now Loading

टायगर सेना बीड जिल्हा अध्यक्षपदी केज येथील संजय काळदाते यांची निवड.

टायगर सेना बीड जिल्हा अध्यक्षपदी केज येथील संजय काळदाते यांची निवड. केज येथील धडाडीचे युवक कार्यकर्ते संजय काळदाते यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन जँकीदादा सावंत संस्थापक अध्यक्ष टायगर सेना यांनी त्यांची बीड जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली असल्याचे पत्राद्वारे कळविले आहे. त्या आशियाचे नियुक्ती पत्र देखील संजय काळदाते यांना त्यांनी दिले आहे. शेतकरी, कष्टकरी, मजुर, दलित, भटके विमुक्त, आदिवासी, अल्पसंख्याक या सर्व समाजातील नागरिक, तरूणांना न्याय मिळवून देण्यासाठी या संघटनेच्या माध्यमातून कार्य करावे. सामाजिक चळवळ उभी करून टायगर सेना बळकट करण्यासाठी प्रयत्न करावे असे निवडीच्या पत्रात नमूद केले आहे. टायग सेनेचे मुख्य कार्यालय अंधेरी मुंबई येथे असून संपर्क कार्यालय उदगीर जि. लातूर येथे आहे. संजय काळदाते यांची टायगर सेना बीड जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांच्या मित्रपरिवाराकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.