Now Loading

लोखंड घेऊन जाऊ नका म्हणाल्यावरून शेतकऱ्याचे दगडाने डोके फोडले

केज दि. 22 - शेतीच्या बांधावरील लोखंड घेऊन जाऊ नका असे म्हणाल्यावरुन एका वृद्ध शेतकऱ्यास शिवीगाळ करीत दगडाने मारहाण करुन डोके फोडल्याची घटना केज शहरातील भवानी माळ येथे घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. बीड .केज तालुक्यातील पिसेगाव येथील शेतकरी महादेव भानुदास नेहरकर (वय 67 ) यांची केज शहरातील भवानी माळ येथे शेती आहे. 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास कृष्णा सोपान राऊत ( रा. भवानी माळ, केज ) व एक अनोळखी मुलगा हे दोघे त्यांच्या बांधावर टाकलेले लोखंड घेऊन निघाले असता महादेव नेहरकर यांनी लोखंड घेऊन जाण्यास विरोध केला. त्यावरून कृष्णा याने त्यांचे दोन्ही हात धरले, तर अनोळखी मुलाने त्यांच्या डोक्यात दगड मारुन डोके फोडले. तु जर आरडाओरडा केलास तर तुला जिवे मारुन टाकू अशी धमकी देत शिवीगाळ करित निघुन गेले. अशी फिर्याद महादेव नेहरकर यांनी दिल्यावरुन कृष्णा राऊत व अनोळखी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक दिलीप गित्ते हे करीत आहेत.