Now Loading

शहरात छुप्या पध्दतीने गुटख्याची सर्रासपणे विक्री सुरू

धुळे ;शहरात छुप्या पध्दतीने गुटख्याची सर्रासपणे विक्री केली जात आहे. महाराष्ट्रात गुटख्यावर बंदी आणण्यात आली आहे. असेअसतानाही गुटख्याची विक्री अद्याप बंद झालेली नाही. याउलट गुटख्याची चढ्या भावाने विक्री करून रग्गड पैसाकमाविला जात आहे. गुटख्यावर बंदी असल्याचे डागोरे पिटीतआपले उखळ पांढरे करणाNयांना सुगीचे दिवस आले आहेत.त्यामुळे यासाठी एक रॅकेटच सक्रीय आहे.या रॅकेटच्याविरोधात केवळ थातुर मारुत स्वरुपाची कारवाई करुन वेळमारुन नेली जात आहे. त्यामुळे हे रॅकेट अवघ्या काही दिवसातच आपली पाळेमुळे घट्ट रोवु लागले आहे. त्यामुळेच शहरात सहजच गुटखा मिळत असल्याची चर्चा आता दस्तुखुद जनतेतुनच दबक्या आवाजात होवु लागली आहे. संबधित विभाग हा केवळ नावालाच असुन त्यांच्याकडून केवळ कधीतरी कारवाई करुन त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न होत आहे. संबधित विभागाने आपली कर्तव्याची जबाबदारी चोखपणे बजविल्यास आरोपी यांना पळ काढणे मुश्किल झाल्याशिवाय राहणार नाही. काही ठिकाणी तर लाखोंचा गुटखा पकडला जात आहे. तर काही ठिकाणी थोडया प्रमाणावर गुटखा पकडण्याचा बागुलबुवा चालला आहे.   गुटख्याची तस्करी करणारयांनीआता आपली पाळेमुळे ही घट्ट रोवली असल्याने त्यांच्याकडूनमोठया प्रमाणावर गुटखा तस्करीचा उपदव्याप हा सुरु आहे. यासंदर्भात जनतेतून वेळोवेळी ओरड होत आहे. असे असतांनाही संबधितांकडून सोयीस्कीरपणे डोळेझाक करण्यापलीकडे काहीच केले जात नाही आहे. अधुनमधून कारवाई केली जात असते. पंरतुया प्रकारांना आळा बसत नाही आहे. या गुटखा तस्करांना कोणाचा आशिर्वाद आहे. त्यांना एवढी हिंमत कशी मिळते. या साNयाच प्रश्नांची उकल होणे गरजेचे आहे. पंरतु यासंदर्भात कर्तव्य कठोर पावले ही उचलली जात नसल्याने या व्यवसायिकांची दिवसागणिक हिंमत ही वाढत चालली आहे.  या व्यवसायातून मोठया प्रमाणावर पैसे मिळत असल्याने गुटख्याची तस्करी करणाNयांना आजपर्यंत पुर्णपणे अटकाव करण्यास संबधित विभाग हा कुचकामी ठरला असल्याचे हे घोतक आहे. शहरातील टपNयांवर अथवा ग्रामीण भागातील काही ठिकाणी गुटखा हा सहजमिळत आहे. गुटख्यावर जर शासनाने बंदी आणली आहे. तर महाराष्ट्रात गुटखा सहजच का मिळतो आहे.  असा सवाल आता जनतेतुन उपस्थित होवु लागला आहे. गुटख्याची तस्करी करणारे हे गुटखा सापडु नये यासाठी वेगवेगळी शक्कल लढवतआहेत. हे तस्कर कधी मुरमुरयाच्या पोत्यांच्या आड अथवा इतर वस्तुंच्या आड त्यांची तस्करी करण्याचा उपदव्याप करीत सुटले आहेत. आता या गुटखा तस्करांना कायमची अद्दल घडविण्यासाठी आणि गुटख्याची तस्करी होणार नाही. यासाठी संबधितांनी कर्तव्य कठोर पावले उचलावीत अशी मागणी जनतेतून होवु लागली आह