Now Loading

असदुद्दीन ओवेसी इम्तियाज जलील यांचे भाषण सुरू असताना कुठे गेले होते? हा व्हिडीओ आला समोर

सोलापूर : मंगळवारी हुतात्मा स्मृती मंदिर सभागृहात मध्ये एमआयएम पक्षाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. हा मेळावा आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षासाठी ऊर्जा देऊन गेला. एम आयएम नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आपल्या 40 मिनिटाच्या भाषणातून उपस्थित मुस्लिम बांधवांमध्ये स्फुल्लींग चेतले. ओवेसी यांच्या पूर्वी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील यांचे भाषण होते, जलिल यांचे भाषण सुरू असतानाच साधारण दीड पावणे दोनच्या सुमारास खासदार असदुद्दीन ओवेसी हे हुतात्मा स्मृती मंदिरातील स्टेजच्या पाठीमागे दहा मिनिटासाठी गेले अनेकांना प्रश्न पडला ते नेमके कुठे गेले असतील? काहींना वाटले ते बाथरूम गेले असतील मात्र ते आपल्या भाषणापूर्वी दुपारच्या नमाज पठणासाठी गेले होते त्या नमाज पठणाचा व्हिडिओ समोर आला आहे. त्या व्हिडिओमध्ये खासदार ओबीसी हे नमाज पठण करत आहेत आणि इम्तियाज जलील यांच्या भाषणाचा आवाज येत आहे पहा तो व्हिडिओ