Now Loading

सोलापूर : अक्कलकोट येथे चंदन तस्करांच्या आवळल्या मुसक्या ; एवढ्या लाखाचे चंदन केले जप्त

सोलापूर : चंदनाची चोरी करून वाहतूक करणाऱ्या दोघांना साहित्यासह अटक करण्यात आली. सुमारे दोन लाख 30 हजाराचा मुद्देमाल जप्त करून चंदन खरेदी करणाऱ्या एकास पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्हयातील गुन्हयांचा आढावा घेतले असताना चंदन चोरीच्या गुन्हयात वाढ झाल्याने हे गुन्हे उघडकीस आणून त्यास प्रतिबंध करून कारवाई करणेकामी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना सुचना दिल्या होत्या त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी गुन्हे शाखेकडील पोसई शैलेश खेडकर यांचे पथक नेमले होते. 21 नोव्हेंबर 2021 रोजी दोन इसम मोटार सायकल नंबर एम एच 13 बीएच 7464 वरून चोरलेली चंदनाची लाकडे, व लाकडे तोडण्यासाठी लागणारे साहित्यासह मौजे हन्नुर तालुका अक्कलकोट मार्गे इटकळकडे जाणार असल्याची माहिती मिळाली. या बातमी आधारे कारवाई करणेकामी अक्कलकोट शहरात हजर असलेले पोसई शैलेष खेडकर व त्यांचे पथकास कारवाई करणेस सांगितले. त्याप्रमाणे पोसई शैलेष खेडकर व त्यांचे पथक अक्कलकोट शहरातून निघून मौजे हन्नूर ते इटकळ जाणारे रोडवर काही अंतरावर दबा धरून बसले असताना मौजे हन्नूर गांवाकडून एक मोटार सायकल येत असताना दिसली. त्यांच्यावर संशय आल्याने त्यास थांबविण्याचा इशारा केला असता मोटार सायकल न थांबता तसीच पुढे निघून गेली त्यास पाठलाग करून पकडले. त्यांचे कब्जातील प्लास्टिकचा पोता व पिशवी तपासून पाहिली असता पोत्यामध्ये सुगंधी चंदनाचे लाकडे व लाकडे तोडण्यासाठी लागणारे 6 लाकडी दांडके, 4 नग लोखंडी गिरमिट, 1 लोखंडी कुदळ, 1 लोखंडी वाकर्स, 1 धार लावण्याकरीता दगड, 1 करवत, 2 लोखंडी कु-हाडीचे पाते, 1 मोटार सायकल असा एकूण 2,31,800 रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने त्यांचे विरूध्द पोहेकाॅ धनाजी देविदास गाडे यांनी फिर्याद दिल्याने अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयातील 02 आरोपीना अटक करून त्यांना न्यायालयात हजर करून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेवून रिमांड मुदतीत गुन्हयातील चंदनाची लाकडे विकत घेणारा तिस-या आरोपीस अटक केली आहे. अधिक तपास पोसई शैलेष खेडकर हे करीत आहे.