Now Loading

केज कानडी माळी येथे बांधला लोकसहभागातून वनराई बंधारा

केज तालुक्यातील मौजे कानडी माळी येथे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांच्या संकल्पनेने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त पंचायत समिती केज व महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक यूनियन केज यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसहभागातून वनराई बंधारा बांधण्यात आला. कानडी माळी येथे बीड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांच्या संकल्पनेतून आणि केज पंचायत समितीचे गटविकास अधीकारी विठ्ठल नागरगोजे, लघु पाटबंधारे उपअभियंता सोळुंके, विस्तार अधिकारी (पं.) चौरे, सरपंच अमर राऊत, जिल्हा उपाध्यक्ष ग्रामसेवक यूनियनचे मधुकर शेळके, तालुका अध्यक्ष धनराज सोनवणे, तालुका सचिव ओम चोपणे, तालुका उपाध्यक्ष शिवाजी पटाईत, सखाराम काशिद, प्रविण तेलप, राजाभाऊ वरपे, दत्तात्रय गव्हाणे, साखरे, यादव, रोहीदास अडसरे, प्रकाश करपे, थोरात मॅडम, गोरे मॅडम, फुलझळके मॅडम, शिंदे मॅडम, गुंडरे मॅडम यांच्यासह केज तालुक्यातील सर्व ग्रामसेवक यांनी श्रमदान करुन वनराई बंधारा बांधण्यास योगदान दिले.