Now Loading

आबेजागाई घाटनांदुर येथे डीपीच्या साहित्याची चोरी

अंबाजोगाई : डीपीची तोडफोड करून त्यातील साहित्याची चोरी केल्याची घटना तालुक्यातील घाटनांदुर येथे सोमवारी (दि. २२) उघडकीस आली. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. घाटनांदुर येथे असलेल्या डीपी ची तोडफोड करून डीपी मधील कॉईल, रॉड, ऑईल व किटकॅट फ्युज असे एकूण ३३ हजार २२५ रुपयांची साहित्य चोरून नेले. याप्रकरणी घाटनांदूर येथील महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता संतोष परघणे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस जमादार यु. पी. सावंत पुढील तपास करीत आहेत.