Now Loading

ग्रंथ दिंडी यशस्वी करण्यासाठी संमेलनाच्या संयाेजकांबराेबरच संस्था चालक, मुख्याध्यापक, शिक्षक पुढाकार घेणार

नाशिक - साहित्य आणि शिक्षण यांचा फार जवळचा संबंध असून शिक्षक फक्त साहित्याचे अध्यापन करत नाही तर मातृभाषेचे जतन संवर्धन करीत असतात. साहित्य संमेलन हा विद्यार्थी जीवनातील अतिशय महत्वाचा बिंदू असून शिक्षक व विद्यार्थ्यानी नाशिक येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात माेठ्या संख्येने सहभागी व्हवे असे आवाहन शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी महाकवी कालिदास कलामंदिरात झालेल्या मुख्याध्यापकांच्या सहविचार सभेत व्यक्त केले. यावेळी शिक्षकांना मार्गदर्शन करताना म्हणाले, ग्रंथ दिंडी हा साहित्य संमेलनातील महत्वाचा टप्पा असून ही दिंडी यशस्वी करण्यासाठी संमेलनाच्या संयाेजकांबराेबरच संस्था चालक, मुख्याध्यापक, शिक्षक यांनी पुढाकार घेतला आहे शुक्रवार दि. ३ डिसेंबर २०२१ ला निघणाèया साहित्य दिंडीत सहभागी हाेऊ या. नाशिकच्या सांस्कृतिक परंपरेचे जतन करण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे त्यात समाजातील सर्वांचाच सहभाग महत्वाचा आहे. यावेळी संमेलनाचे कार्यवाह प्रा. डाॅ. शंकर बाेहाडे यांनी शिक्षण आणि साहित्य, साहित्य संमेलन आणि शैक्षणिक संस्था यांच अनुबंध स्पष्ट करुन संमेलनात शिक्षकांनी माेठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे निमंत्रण शिक्षकांना दिले. यावेळी शिक्षणाधिकारी श्रीमती धनगर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित हाेत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर यांनी केले. कार्यक्रमाची रुपरेषा बाल कुमार मेळाव्याचे संताेष हुदलीकर, संमेलनाचे कार्यवाह संजय करंजकर, ग्रंथदिंडीचे प्रमुख विनायक रानडे, एमईटीचे समन्वयक संभाजी पाटील यांनी स्पष्ट केली. या कार्यक्रमास महानगर क्षेत्रातील ३५० मुख्याध्यापकांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीता बागुल यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंगेश बिरारी यांनी विशेष परिश्रम घेतले.