Now Loading

चिमुर विधानसभा क्षेत्राचे,आमदार, बंटी भांगडीया यांनीही दिला होता पाठिंबा

चिमूर आगारातील, एस.टी कर्मचाऱ्यांचा संपाला शिवनपायली - मोठेगाव,येथील भा.ज.पा.कार्यकर्त्यांनी दर्शविला पाठिंबा  एस.टी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे यासाठी महामंडळ कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे.शासन नियमा प्रमाणे सर्व सोयी सवलती व वेतन लागू करण्यात यावे,कर्मचार्‍याच्या पगारात होणारी हेळसांड व त्यामुळे सुमारे ३६ कर्मचाऱ्यांचा झालेल्या आत्महत्या या सर्व बाबीचा विचार न करता ही हुकूमशाही ठाकरे महाविकास आघाडी सरकार या कर्मचाऱ्यांवर अन्याय करत आहे.खऱ्या अर्थाने जनतेची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा कर्मऱ्या यांची मागणी रास्त असून महाविकास आघाडी सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे.या हुकुमशाही सरकारचा निषेध करीत.त्याच्या संपाला पूर्णता समर्थन देत असून शासनाने या संपा वरील तोडगा काढून महाराष्ट्रातील जनतेला त्वरित दिलासा द्यावा व प्रलंबित प्रश्न निकाली काढावा याकरिता भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य, डॉ. श्यामजी हटवादे, यांच्या मार्गदर्शनाखाली शिवनपायली - मोठेगाव येथील भा.ज.पा कार्यकर्ते कनीलाल नाकाडे,अजित सुकारे,जीवन बोरकर,संजय नागोसे,आनंदराव बोरकर,विलास पर्वते,अरुण बोरकर,मधुकर बोरकर, लक्ष्मण नाकाडे,हेमंत पोहिनकर,गिरिधर बोरकर,वामन बोरकर,गणेश गहाणे,आदी भा.ज.पा कार्यकर्त्यांनी, भेट देऊन पाठिंबा दर्शविला.