Now Loading

पंचवटीतील पेठरोडवर एकाची हत्या

पंचवटीतील पेठरोड वरील आरटीओ ऑफिस समोर मध्यरात्रीच्या सुमारास एकाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याचा व्यवसाय करणारे राजेश शिंदे ( रा.भराडवाडी, फुलेंनगर) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलीसांनी या घटनेबाबत माहिती नुसार, मध्यरात्री १२ ते १२.३० वाजेच्या सुमारास मयत राजेश शिंदे दुचाकीवरून घरी जात असताना पेठरोड येथील आरटीओ कार्यालया समोरील रस्त्यावर अज्ञात काही हल्लेखोरांनी राजेश शिंदे यास अडवून डोक्यावर दगडाने घाव घातला. यात शिंदेचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. हत्या कोणी व का केली याबाबत पोलीस माहिती घेत असून मध्यरात्री रात्री उशिरापर्यंत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.