Now Loading

मा. शारद पवार साहेब यांना गडचिरोली जिल्ह्यातील सर्व खदानी रद्द व्हावे यासाठी निवेदन

दिनांक 18 नोव्हेबर रोजी मा. शारद पवार साहेब यांना गडचिरोली जिल्ह्यातील सर्व खदानी रद्द व्हावे यासाठी निवेदन देण्यात आले. एटापल्ली तालुक्यातील सुरजागडसह गडचिरोली जिल्ह्यात 25 बेकायदा खदानी प्रस्तावित व सुरु आहेत. या सर्व खदानींना जिल्हास्तरीय महग्रामसभा स्वयत्त परिषद, गडचिरोली व सुरजागड पट्टी पारंपारिक इलाका गोटूल समितीसह जिल्ह्यातील सर्व ग्रामसभा व इलाके सुरूवातीपासूनाच विरोध करत आहेत. या सर्व खदानी बेकायदा असून विनाशकारी आहेत. या सर्व लोह प्रकल्प गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी पर्यायाने गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी व इतर पारंपारिक वन निवासी यांचा विकास व्हावा यासाठी सुरु करण्यात आले आहेत. परंतू संपूर्ण विश्वात खदानिमुळे किंवा जंगल कापून, जमीन खोदून, पहाड़ी तोडून कुठेही विकास झाला नाही. हे सर्व प्रकल्प विध्वंसक आहेत.असे निवेदनातुन केली आहे