Now Loading

ग्रामगितेचे तत्वज्ञानानुसार ग्रामविकास करावा : प. स. सदस्य प्रदीप कामडी

ग्रामगितेचे तत्वज्ञानानुसार ग्रामविकास करावा : प. स. सदस्य प्रदीप कामडी चिमूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेल्या ग्रामगितेत आदर्श जीवन कसे जगावे, याबद्दल व ग्रामविकास कसा साधावा याबद्दल विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले आहे. प्रत्येक गावातील नागरिकांनी ग्रामगितेचा अभ्यास करून त्यातील तत्वज्ञानानुसार ग्रामविकास करावा, असे प्रतिपादन प. स. सदस्य प्रदीप कामडी यांनी केले. शनिवार 20 नोव्हेंबर रोजी भिसी येथून पाच किमी अंतरावरील मौजा पारडपार येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे ह.भ.प. कापसे महाराज, राजुभाऊ कापसे ( माजी पंचायत समिती सदस्य ) , रामदास चौधरी ( सरपंच बोरगाव बुट्टी ) संदिप दोडके ( सरपंच, आंबेनेरी ) , कुंडलीक नन्नावरे ( गुरुदेव सेवा मंडळा अध्यक्ष, खापरी ), चिरकुटा चौधरी ( अध्यक्ष – तंटामुक्त गाव समिती पारडपार ) , लता रामटेके ( पोलिस पाटील पारडपार ) , दुर्वास नंदनवार आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मेश्राम सर ( जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडपार ) , आभार प्रदर्शन कैलास घोडमारे ( माजी सरपंच पारडपार ) यांनी केले.