Now Loading

स्थानिक स्वराज्य संस्थेचा बिगुल वाजला उमेदवारी अर्ज दाखल

धुळे ह धुळे - नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातर्पेâ आ.अमरिशभाई पटेल, काँगे्रस-राष्ट्रवादी-शिवसेना महाविकास आघाडीतर्पेâ गौरव वाणी यांनी तर नंदुरबार नगरपालिकेचे नगरसेवक दिपक दिघे यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. आ.अमरिशभाई पटेल यांचा उमेदवारी अर्ज दाखल प्रसंगी राज्याचे माजी मंत्री आ.गिरीश महाजन, आ.जयकुमार रावल, डॉ.सुभाष भामरे, खा.हिना गावीत, आ.काशिराम पावरा तर महाविकास आघाडीचे उमेदवार गौरव वाणी यांचा उमेदवारी अर्ज दाखल प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँगे्रसचे कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील, काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, माजी मंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख हिलाल माळी, प्रा.शरद पाटील, माजी आ.डी.एस.अहिरे, जि.प.अध्यक्षा सीमा वळवी आदी उपस्थित होते. विजय आपलाच असल्याचा दावा आ.अमरिशभाई पटेल अन् गौरव वाणी यांनी केला आहे.  धुळे - नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज अंतीम मुदत होती. भाजपातर्पेâ आ.अमरिशभाई पटेल अन् महाविकास आघाडीतर्पेâ गौरव वाणी यांना उमेदवारी जाहीर झाली होती. आज आ.अमरिशभाई पटेल अन् गौरव वाणी यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजपातर्पेâ उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आ.अमरिशभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली श्री विले पार्ले केळवणी मंडळ कॅम्पस (गुरुद्वारा मागे) येथे अनेक मान्यवर तसेच धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आली. यावेळी माजी मंत्री गिरीष महाजन म्हणाले, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून अमरिशभाई पटेल यांचे एकमेव नाव पक्षाकडे आले, भाईंचा आम्हाला सर्वांंना अभिमान आहे. दिल्ली येथून देखील पक्षाने भाईंचे प्राधान्याने नाव पुढे केले. आपला विजय १०० टक्के नक्की आहे, सर्वांनी मताधिक्यासाठी प्रयत्न करावे. सर्व मतदार यांना सोबत घेऊन आपण काम करावे, भाजपाची ताकद सर्वत्र वाढतेय व वाढवायचीय. भाईंच्या कामाची पध्दत उत्कृष्ट आहे. ते सर्व पक्षाला घेऊन चालतात, भाई कोहिनूर हिरा आहेत, भाईंना शुभेच्छा देतो. यावेळी माजी मंत्री जयकुमार रावल म्हणाले, भाजपा कार्यकर्ते परिश्रमातून पुढे आले आहेत, अनेक ठिकाणी भाजपाची सत्ता आहे. विधान परिषदेत भाई यांच्या सारखे तज्ज्ञ व्यक्ती यांची गरज आहे. भाईंनी शिक्षण, राजकीय व सर्वच क्षेत्रात अतुलनीय कामगिरी बजावली आहे. महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक निवडणूक होईल. भाई हे जनतेत जावून काम करणारे नेते म्हणून भाई हे लोकप्रिय आहेत. भाईंनी जिल्ह्याच्या विकासासाठी नेहमीच काम केले आहे. पक्ष कोणताही असो ते सतत विकासासाठी काम करतात. धुळे नंदुरबार दोन्ही जिल्ह्यात सर्व नेते यांच्यात स्नेहभाव आज देखील आहे. डॉ. विजयकुमार गावित म्हणाले, सर्वपक्षीय भाईंचे मित्र आहेत. भाईंचे सर्वच क्षेत्रात कार्य मोठे आहे. भाईंना सर्वजण ओळखतात. त्यांचे कार्य उज्ज्वल आहे. त्यांना सर्व पक्ष मानतात. त्यांना विजयासाठी शुभेच्छा देतो. माजी मंत्री अमरिशभाई पटेल म्हणाले, भाजपा हा विचारधारा असलेला पक्ष आहे. माझे घर सर्वांसाठी खुले आहे. सार्वजनिक जीवनात सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले. दोन्ही जिल्ह्यात विकासकामे करण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील आहे. आपण सर्वांनी सहकार्य करावे. एक परिवार म्हणून आपण काम करु या. खा. डॉ. हिनाताई गावित म्हणाल्या, भाईंनी भाजपा मध्ये प्रवेश घेतल्याने पक्षाची ताकद वाढली आहे. २ वर्षे बाकी असतांना भाईंनी आमदारकीचा राजीनामा देऊन पोटनिवडणूक लढवून ते पुन्हा विजयी झाले. शिस्तप्रिय भाई सर्वांना घेऊन चालतात, ही अभिमानाची बाब आहे. खा. डॉ. सुभाष भामरे म्हणाले, भाईंनी भाजपा मध्ये प्रवेश केला आपण सर्व जण भाग्यवान आहोत. भाई तुमचाच विजय पक्का आहे, आपणांस सर्व पक्षात आदर आहे. भाई महाराष्ट्रात सर्वात जास्त मतांनी निवडून येतील. धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, धुळे महापौर प्रदीप कर्पे, भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, धुळे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी मनोगत व्यक्त करून भाईंना पाठिंबा देत मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री आमदार गिरीषभाऊ महाजन, माजी मंत्री आमदार जयकुमार रावल, भाजपा संघटन मंत्री रविंद्र अनासपुरे, माजी मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित, खा. डॉ. सुभाष बाबा भामरे, खा. डॉ. हिनाताई गावित, उमेदवार