Now Loading

राष्ट्रसंतांच्या विचारातच जीवनाचे कल्याण : आ. किर्तीकुमार भांगडिया

राष्ट्रसंतांच्या विचारसरणीचे प्रत्यक्ष जीवनात अनुकरण आपण आपल्या जीवशैलीत केलं तर नक्कीच आपल्या जीवनाचे कल्याण होणार, असे प्रतिपादन आ. किर्तीकुमार भांगडिया यांनी केले. ते चंद्रपूर जिल्ह्यातील खडसंगी येथील ग्रामदर्शन विद्यालयात वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंच गुरुकुंज मोझरी महाराष्ट्र राज्य शाखा-खडसंगी द्वारा आयोजित श्री गुरुदेव सेवा मंडळ कार्यकर्ता संमेलनात बोलत होते. पुढे बोलताना आमदार किर्तीकुमार भांगडिया यांनी गुरुदेव सेवा मंडळाच्या युवक कार्यकर्त्यांना आवाहन केलं की, आगामी काळात संमेलन-उत्सव साजरे करताना समाजातील वंचित-शोषित घटकांसाठी आरोग्यविषयक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करावा. या बाबीसाठी लागणारी सर्वोतोपरी मदत करण्याचं आश्वासन त्यांनी उपस्थित युवकांना दिलं.मंचावर न बसता त्यांनी उपस्थितांजनतेत बसून कार्यक्रमात सहभाग घेतला. या वेळी मंचावर गुरुकुंज मोझरी येथील संचालक रवी मानव, युवक विचार मंच चे संस्थापक अमर वानखेडे , नरेंद्र जीवतोडे, ह.भ.प. ईश्वर महाराज,प्राचार्य सदाशिव मेश्राम,माजी सभापती राजू झाडे,राजू देवतळे, मनी रॉय उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मधुकर बन्सोड, विनायक औतकर, प्रमोद श्रीरामे,डॉ. दीपक दडमल,राहुल तराळे, प्रशांत मेश्राम, प्रतीक औतकर, प्रतीक चिंचाळकर, अमृत बावणे, हरी कामडी,वैभव नन्नावरे,करण नागोसे यांनी परिश्रम घेतले.