Now Loading

ग्रामपंचायत केवाडा चा अनहोनी कारभार ग्रा प सदस्य भक्तप्रल्हाद शेंडे,यांचा आरोप

चंद्रपूर जिल्ह्यातील मासळ -मदानापूर जिल्हा परिषद क्षेत्रातील केवाडा ग्रामपंचायत चा अनहोनी कारभार होत आहे असे आरोप भसक्तप्रल्हाद शेंडे ग्रामपंचायत सदस्य यांनी केला आहे सविस्तर माहिती अशी की, येथील ग्रामशेवक ग्रामपंचायत कार्यालयाला महिन्यातुन दोन ते तीन दिवस हजर असतात , दलित वस्ती सिंचन योजना टाकीचे काम होहूनही त्या दलीत वस्तीतील 30 ते 40 जनतेपर्यंत पाण्याची सोय करून दिले नाही व थेथील लाभार्थी नळ कनेक्शन पासून वंचित आहेत बाकी नळ कनेक्शन लाभार्थ्यांना कनेक्शन मिळाले नाही म्हणून जिल्ह्या परिषद चे c o चंद्रपूर यांच्याकडे बाकी लाभार्थ्यांना लाभ मिळावा याकरिता विनंती अर्ज केला . व वैयक्तिक लाभार्थ्यांना पैशाची मागणी करीत आहे येथील ठेदाराचे कामगार, तचेच मासिक सभेत कामाची विचारना केली असता सरपंच व सचिव उडवा उडावीचे उत्तर देत असतात व दलित वस्तीचे काम , नल्याचे कामे, नळ योजनेचे कामे कोणी केले असे विचारणा केली असता तेआम्हाला माहीत नाही असे उत्तर मिळत आहे गावातील सर्व नागरिकांना पाण्यासाठी कुठेही भटकंती न करावे या साठी शासनाने गावागावात नळ योजना अमलात आणली व निधी ही देण्यात आले व पाण्याचा टाकीचे काम पूर्ण झाले तरी मागील एक वर्षपासून ही नळ योजना बंद आहे व गावातील नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत वरील सर्व कामाची माहिती येथील सरपंच व सचिव यांना विचारले असता उत्तर मिळत नाही तरी केवाडा गावाचा विकासाकरिता वरिष्ठ अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर, व पंचायत समिती अधिकारी यांनी दखल घ्यावी अशी मागणी ग्रा प सदस्य भक्तप्रल्हाद शेंडे यांनी केले आहे