Now Loading

ISIS काश्मीरने माजी भारतीय क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीर यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे

भारतीय संघाचे माजी दिग्गज फलंदाज आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार गौतम गंभीर यांना इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया, काश्मीर (Islamic State of Iraq and the Levant) या दहशतवादी संघटनेकडून धमक्या मिळाल्या आहेत. यानंतर दिल्ली पोलिसांनी त्याच्या घराची सुरक्षा वाढवली आहे. गौतम गंभीरने आज सकाळी दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला आणि सांगितले की त्याला ISIS काश्मीरकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. हा प्रकार समोर आल्यानंतर डीसीपी सेंट्रल श्वेता चौहान यांनी सांगितले की, तक्रार आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.