Now Loading

बसपाने गुरुनानक जयंती साजरी केली

बसपाने गुरुनानक जयंती साजरी केली* मानवतावादी शिख धर्माचे संस्थापक गुरू नानकदेव यांची जयंती आज नागपुरात सम्राट अशोक नगरातील बसपाच्या जनसंपर्क कार्यालयात साजरी करण्यात आली. त्यानंतर नागपुरातील शिखांचा सर्वात जुना व अत्यंत पूजनीय असलेला गुरुनानक पुऱ्यातील गुरुद्वारा गुरुनानक दरबार येथे बसपा कार्यकर्त्यांनी जाऊन गुरुग्रंथ साहेबांना व ग्रंथींना अभिवादन केले*. गुरुग्रंथी यांच्या आग्रहास्तव लंगरमध्ये भोजनाचा प्रसादा घेतला. याप्रसंगी प्रामुख्याने याच परिसरातील बसपा चे माजी नगरसेवक संजय जयस्वाल, महाराष्ट्र प्रदेश बसपाचे जेष्ठ नेते उत्तम शेवडे, माजी शहर प्रभारी महेश शहारे, शहर कोषाध्यक्ष मुकेश मेश्राम, माजी मनपा पक्षनेता गौतम पाटील, मध्य नागपूर चे अध्यक्ष प्रवीण पाटील, दक्षिण-पश्चिम चे माजी अध्यक्ष सदानंद जामगडे, उत्तर नागपुरातील युवा कार्यकर्ते सुबोध साखरे, मॅक्स बोधी, परेश जामगडे, तपेश पाटील, प्रकाश फुले, अविनाश नारनवरे आदि प्रमुख कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते