Now Loading

डीजीटल मिडीया च्या पत्रकारांसाठी नि:शुल्क वृत्त स्पर्धाचे आयोजन

चंद्रपूर:-6 जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिन साजरा केल्या जातो. यावर्षी पत्रकार दिनाचे औचित्याने रविवार दिनांक 9 जानेवारी रोजी डिजिटल मीडिया असोसिएशनच्या वतीने न्यूज पोर्टल व यूट्यूब चैनल साठी एका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेमध्ये विजेते होणाऱ्यांना प्रथम व द्वितीय स्तराचे पुरस्कार देण्यात येत आहे. ही स्पर्धा संपूर्ण जिल्ह्यात न्यूज पोर्टल व यूट्यूब चैनल यांच्यासाठी आयोजित करण्यात आली असून रविवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी एमडीएचे कार्यालयात घेण्यात आलेल्या सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला. आपापल्या युट्युब व न्यूज पोर्टल वर या स्पर्धेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण यूट्यूब चैनल वर न्यूज पोर्टल यांना या स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्यांना खालील विषयांवर त्यांचे वृत्त प्रकाशित करावे. विषय :- (१) चंद्रपूर जिल्ह्यामधील मूळ समस्यांवर आपले वृत्त. (२) यशोगाथा किंवा व्यक्तिविशेष (३) वन्यप्राण्यांच्या हमला : समस्या व समाधान या तीन विषयांवर प्रकाशित वृत्त स्पर्धेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. सोमवार दिनांक 22 नोव्हेंबर 2021 पासून ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत एक दिवसांमध्ये प्रकाशित वृत्तांना प्राधान्य दिले जाईल. तीन वेगवेगळ्या विषयांवर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून वरील विषयावर वृत्त प्रकाशित करणाऱ्यांना प्रथम पारितोषिक रोख 1000 रुपये प्रथम, 700 रुपये द्वितीय, शाल, श्रीफळ व सन्मानपत्र व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची निवड करण्यासाठी एक परीक्षक मंडळ नेमण्यात येणार असून परीक्षक मंडळाचा निर्णय हा अंतिम राहणार आहे. डिजिटल मीडियाशी संबंधित प्रत्येकांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. आजच्या सोशल मीडिया चा वापर मोठ्या होत असून अनेक गैरसमज पाळल्या जात आहेत अफवा पसरवल्या जात आहे. यावर तोडगा निघावा हा या स्पर्धेचा हेतु आहे. आपला जास्तीत जास्त सहभाग या स्पर्धेतील यशस्वी करावे. सोशल मीडिया ला मान्यता मिळावी यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्नही करण्यात येत आहे. स्पर्धेच्या युगात आपण सर्वश्रेष्ठ व उत्कृष्ट राहावे यासाठी या स्पर्धेचे आयोजन डिजिटल मिडिया असोसिएशनच्या माध्यमातून करण्यात आले आहे. डिजिटल मीडियाशी संबंधित जास्तीत जास्त पोर्टलधारक व यूट्यूब चैनल वाल्यांनी यात सहभागी व्हावे असे आव्हान या माध्यमातून आयोजकांनी केले आहे. सोमवार दिनांक 22 नोव्हेंबर 2021 ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत स्पर्धेमध्ये निर्धारित विषयाशी संलग्नित वृत्तांनाचं या स्पर्धेत समाविष्ट करण्यात येणार आहे. यांची नोंद स्पर्धकांनी घ्यावी.