Now Loading

गोदावरी गंगा पूजनाच्या अठराव्या वर्षी धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या

गोदावरी गंगा पूजनाच्या अठराव्या वर्षी धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या संयोजनाखाली शेकडो महिलांनी एकाच वेळी गोदावरीची आरती करून नदीपात्रात हजारो दिवे सोडतानाचे नयनमनोहर दृश्य ‘याची देही याची डोळा ’ पाहण्यासाठी नांदेडकरांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. भाजप महानगर नांदेड,लायंस  क्लब नांदेड सेंट्रल, लायंस  क्लब नांदेड मिड टाऊन,अमरनाथ यात्री संघ, बजरंग दल, संस्कार भारती, निसर्ग मित्र मंडळ, मारवाडी युवा मंच, सालासर भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्तिक पौर्णिमेनिमित्त घेण्यात आलेल्या या सोहळ्याचे उद्घाटन पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या हस्ते, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, नांदेड जिल्हा संघचालक डॉ. सुधीर कोकरे, ज्येष्ठ पत्रकार शंतनू डोईफोडे, लंगर साहिब गुरुद्वाराचे मोर बाबाजी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. संयोजक धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रम घेण्यामागची भूमिका विशद केली. प्रवीण साले यांनी मार्गदर्शन करताना इंटरनेटच्या युगात नवीन पिढी जुन्या परंपरा विसरत जात असताना आपले सांस्कृतिक वैभव जतन करण्यासाठी दिलीप ठाकूर हे सतत कार्यरत असल्याबद्दल कौतुक केले. डॉ. कोकरे,डॉ.रमेश नारलावार यांनी समयोचित मार्गदर्शन केले.उपस्थित राहिलेल्या शेकडो महिलांना दरवर्षी प्रमाणे मोफत दिवे, द्रौण, फुले वितरित करण्यात आले.संतोषगुरू परळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली विधिवत पूजा करण्यात आली. सालासार भजन मंडळाच्या सदस्यांनी पाच आरत्या गायल्या. आपल्या परीवारातील सदस्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी महिलांनी हजारो दिवे नदीपात्रात सोडले.त्यामुळे नगीनाघाटचा परिसर उजळून निघाला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. उत्कृष्ट पुजेची थाळी सजविणा-या ३१ महिलांची निवड भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा वैशाली देशमुख,जिल्हा उपाध्यक्षा सुषमा ठाकूर, अरूणा कुलकर्णी, श्रुती शेट्टी, प्रीती चौहान यांनी केली. सर्व विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात आली.संस्कार भारती तर्फे काढण्यात आलेली भव्य रांगोळी पाहण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली.नांदेडच्या गोदावरी गंगा पूजनाचे वैशिष्ट्य म्हणजे वेळेवर येवून शिस्तीत बसणार्‍या १५०१ महिलांना प्रोत्साहन म्हणून प्रतिष्ठित उद्योजक योगेश जयस्वाल यांच्यातर्फे सुंदर भेटवस्तू देण्यात आल्या. वृक्षमित्र फाउंडेशन तर्फे ५०१ महिलांना बहुगुणी कृष्ण तुळस वितरित करण्यात आल्या. नांदेडच्या गोदावरी गंगा पूजनाची किर्ती देशभरात पोहंचणाऱ्या माध्यम प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला.लायन्सचा डबा, माहेरची उब, कृपाछत्र, कायापालट या उपक्रमामध्ये सहकार्य करणाऱ्या दानशुर नागरिकांचा गौरव करण्यात आला.तीर्थम तर्फे मध्य प्रदेश व गंगासागर यात्रेला जाणा-या  भाविकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.फिटनेस मॉडेल मिस्टर इंडिया रनरअप अथर्व संजय उदावंत यांचा विशेष सत्कार आला. मारवाडी युवा मंच तर्फे उपस्थितांना केशरी दुधाचे वाटप करण्यात आले. गुरुनानक जयंती निमित्त लंगरसाहब गुरुद्वारातर्फे आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा लाभ सर्वांनी घेतला.हरीद्वार-वाराणशीच्या धर्तीवर नांदेड येथील ऐतिहासिक व अभूतपूर्व सोहळा अनुभवण्यासाठी नांदेडकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असली तरी यावेळी मास्क व सॅनिटायझर देऊन कोवीड प्रतिबंधक सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात आले. शांता काबरा यांच्या नेतृत्वाखाली माहेश्वरी महिला मंडळाच्या सदस्यांनी गोदावरीचे पाणी शुद्ध रहावे यासाठी पंचवीस लिटर बायो एम्झाईम तयार केलेले मिश्रण दिलीप ठाकूर यांच्या हस्ते नदीपात्रात सोडले. मनपातर्फे महिलांच्या  सुरक्षितेसाठी जीवरक्षक तैनात करण्यात आले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अभूतपूर्व ठरलेला हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अरुणकुमार काबरा, कामाजी सरोदे, राजेशसिंह ठाकूर, सुभाष पाटील, संतोष भारती , रामराव राऊत महाराज, अनिल चिद्रावार, संजय अग्रवाल, राजेशसिंह कौशिक, जयश्री ठाकूर, संतोष बच्चेवार, कैलास महाराज वैष्णव, दिनेशसिंह ठाकूर, रुपेश व्यास, भागवत संत्रे, जया जैन, एकनाथ राऊत, भारत कुकडे, विजय अतकुरकर यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी लक्ष्मण संगेवार, विजय होकर्णे, उमकांत जोशी, अनिलसिंह हजारी, क्रिपालसिंघ हुजुरिया, डॉ. शीतल भालके, रुपेंद्रसिंघ साहू, संदीप छापरवाल, डी एम देशमुख, बाबुराव पटवारी, डॉ.यशवंत चव्हाण, प्रा.नंदकुमार मेगदे,अश्विनी जाधव, गायत्री तपके, अनुराधा गिराम, नयना गिरगावकर, आनंत हांडे, शैलेश तोष्णीवाल, सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता अवस्थी, मोहन वडजकर, अशोक साखरे, देवेंद्र मोतेवार,गीता झंवर, सुनिता बाहेती, ऊमा लखोटिया, स्वाति काबरा, कोमल लाहोटी,माला शर्मा, सावित्री बजाज ,शकुंतला डाड, निकुंज काबरा, सविता काबरा यांच्यासह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुसऱ्या दिवशी सकाळी दिलीप ठाकूर,अरुणकुमार काबरा, कामाजी सरोदे, कैलास महाराज वैष्णव,राजेश बंग, चंद्रकला कोडमुंजा, कांताबाई एंगडे यांनी नदीपात्रासह नगिनाघाट स्वच्छ केला. ( छाया: करणसिंह बैस, ज्ञानेश्वर सुनेगावकर, धनंजय कुलकर्णी, व्यंकटेश वाकोडीकर)