Now Loading

हिमायतनगर येथे स्नेहभोजन सोहळ्यात मा.आ.नागेश पाटील अष्टिकरांकडुन शभेच्छा

हिमायतनगर येथे स्नेहभोजन सोहळ्यात मा.आ.नागेश पाटील अष्टिकरांकडुन शभेच्छा | प्रत्येक वर्षी दिवाळीच्या निमित्ताने माजी आ.नागेश पाटील आष्टीकर यांच्याकडून स्नेहभोजनचे आयोजन करण्यात येते. मागील २ वर्षपासून कोरोना संक्रमण काळ असल्याने कोणाचीही गाठभेट व सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी असल्याने स्नेहभोजन सोहळा होऊ शकला नाही. त्यामुळे दि.२१ रोजी हिमायतनगर येथे माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला विविध पक्षाचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी- कर्मचारी आणि शेकडो शिवसैनिकांनी उपस्थित होऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि घेतल्या. दरवर्षी माजी आ.नागेश पाटील आष्टीकर हे दिवाळी निमित्त स्नेहभोजनचा कार्यक्रम मूळ गाव आष्टी येथे ठेवत असतात. यंदा मात्र त्यांनी दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन हदगाव – हिमायतनगर येथे वेगवेगळ्या पद्धतीने केले. नुकताच हदगाव तालुक्यातील मानवाडी येथे दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर दि.२१ नोव्हेंबर रोजी त्यांनी हिमायतनगर येथील बोरगडी रोडवर असलेल्या बालाजी माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी आगामी नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक असलेले या स्नेहमिलन कार्यक्रमात अंग झटकून काम करताना दिसून आले.   या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजतापासून झाली, यावेळी तालुक्यातील जेष्ठ, श्रेष्ठ व सर्वच आजी-माजी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. काही शिवसैनिकांनी तर ढोल-ताश्याच्या गजरात कार्यक्रमस्थळी हजेरी लावून उपस्थितांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी माजी आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी उपस्थित झालेल्या सर्वांचं भगवी शाल पांघरून स्वागत करत दिवाळीच्या शुभेछा दिल्याचे पाहावयास मिळाले. यावेळी तालुक्यातील पत्रकार मंडळी देखील उपस्थित झाली होती. त्यानंतर माजी आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी पत्रकारांशी संवाद साधून दरवर्षी प्रमाणे यावेळी संयुक्त कार्यक्रम न घेता वेगवेगळा कार्यक्रम घेतला. एकाच वेळी होणारी गर्दी आणि सर्वांशी संवाद साधने शक्य नसल्याने हदगाव-हिमायतनगर तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम घेतला. राजकारण विरहित असलेल्या कार्यक्रमास अनेकजण वेगवेगळे नाव ठेवत आहेत. नावे ठेवणाऱ्यानी यापेक्षाही मोठा व भव्य कार्यक्रम करून दाखवावा असेही आष्टीकर म्हणाले. हिमायतनगर तालुक्यातील श्रीक्षेत्र बोरगडी येथील राजेश लिंगांनी भैरवाड या युवकाची भारतीय सैन्यात निवड झाली, नऊ महिन्याचे प्रशिक्षण घेऊन तो गावी आल्यामुळे माजी आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी सैनिकाचे स्वागत करून पुढील देशसेवेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी अनेकांनी माजी या.नागेश पाटील आष्टीकर यांचेवर विश्वास ठेऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्या सर्व कार्यकर्त्यांचे आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी स्वागत करून एकनिष्ठेने शिवनेचे काम निष्टपुर्वक करा. शिवसेनेत काम करणार्यांना सामन्यातील सामान्य कार्यकर्त्याला पक्ष मोठं करते असा सल्लाही त्यांनी दिला. मी एकनिष्ठेने काम केलं म्हणून दोन वेळा मला विधानसभेची उमेदवारी पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी दिली.