Now Loading

सामाजिक कार्यकर्ते बन्सी जोगदंड यांना पत्नीशोक

बीड आबेजोगाई .येथील सामाजिक कार्यकर्ते बन्सी जोगदंड यांच्या पत्नीचे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान दुःखद निधन झाले आहे. मौजे ममदापुर (पाटोदा) येथील सामाजिक कार्यकर्ते बन्सी नागोराव जोगदंड ह.मु.स्नेहनगर अंबाजोगाई यांच्या पत्नी तथा राजु बन्सी जोगदंड यांच्या आई सुमनबाई बन्सी जोगदंड वय 60 वर्षे या काही दिवसांपूर्वी पासून आजारी होत्या. त्यांच्यावर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू होते. आज मंगळवार रोजी सायंकाळी सहा वाजता त्यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झालेआहे.