Now Loading

धुळे-चाळीसगाव पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याबाबत  विभागीय रेल्वे अधिकारयांना विनंती

धुळे ; गेल्या २०२० पासून कोरोना महामारीमुळे आजतागायत चाळीसगाव ते धुळे (५१११५) व धुळे ते चाळीसगाव (५१११८) मॅसेंजर ट्रेन मुंबई बोगीसह बंद करण्यात आली आहे. धुळे-चाळीसगाव या रेल्वे मार्गालगत असलेल्या सुमारे शंभर गावातील जनतेची जीवनवाहिनी असलेला हा रेल्वे मार्ग आहे. सदर रेल्वे मार्ग दररोज आपल्या उदरनिर्वाह करणारया जनतेसाठी सुरू होणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच धुळे ते चाळीसगाव येणारया जाणारया प्रवाशांना एसटी बसचे भाडे ७५ रूपये असून रेल्वेचे भाडे अत्यंत माफक १५ रूपये आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र एस. टी. महामंडळ कर्मचाNयांचा विविध मागण्यासाठी बेमुदत संप सुरू आहे. त्यामुळे या मार्गावर दररोज प्रवास करणारया गोरगरीब जनतेचे अतोनात हाल होत आहेत. या रेल्वेने धुळे ते चाळीसगाव दरम्यान शेकडो शेतमजूर शेतीकामासाठी व लहान सहान व्यावसायीक व्यवसायासाठी तसेच शाळा व कॉलेजचे विद्यार्थी शिक्षणासाठी बसभाड्यापेक्षा अत्यत माफक असलेल्या रेल्वे भाड्यात दररोज प्रवास करीत असतात या गोरगरीब शेतमजूर, व्यावसायीक व विद्याथ्र्यांची अत्यत तातडीची गरज लक्षात घेऊन आपण चाळीसगाव ते धुळे (५१११५) व धुळे ते चाळीसगाव (५१११८) पॅसेंटर ट्रेन सुरू करण्याचे आदेश विभागीय रेल्वे अधिकारी भुसावळ याना देण्यात यावे.  चाळीसगाव ते धुळे (५१११५) व धुळे ते चाळीसगाव (५१११८) पॅसेंजर ट्रेन सुरू करण्याबाबतचे निवेदन ई-मेलव्दारे ६ ऑक्टोबर २०२१ रोजी रेल्वे राज्यमंत्री आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक, भुसावळ यांना दिेले होते. परंतु अद्याप सदर पॅसेंजर सुरू करण्याबाबत अद्याप कुठलीही हालचाल सुरू झालेली दिसून येत नाही. (या पत्रासोबत ६ ऑक्टोबर रोजी केलेल्या ई-मेल निवेदनाची प्रत सोबत जोडली आहे.)  तरी या निवेदनाची तात्काळ दाखल घेऊन वर निर्देशित पॅसेंटर ट्रेन त्वारित सुरू करण्याचे आदेश आपल्या अधिकारा त्वरि पारीत करावे, अशी मागणी अभि. राजेंद्र चितोडकर तालुकाध्यक्ष धुळे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस यांनी केली आहे.