Now Loading

IND vs NZ 1st Test: उद्या भारत आणि न्यूझीलंडमध्ये पहिला कसोटी सामना, कोण पदार्पण करणार कर्णधार रहाणेने सांगितले

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ऐतिहासिक ग्रीनपार्क स्टेडियमवर खेळवला जाईल. ही मालिका जिंकून न्यूझीलंडविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील पराभवाचा बदला घेण्याची भारताला संधी आहे. उद्याचा सामना सकाळी 9.30 वाजता सुरू होईल आणि नाणेफेक सकाळी 9 वाजता होईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स चॅनल आणि डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहता येईल. कर्णधार अजिंक्य रहाणेने श्रेयस अय्यर कसोटी पदार्पण करणार असल्याची पुष्टी केली आहे.
 

अधिक माहितीसाठी - News 18 ABP