Now Loading

अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणूकांसाठी असलेल्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात 17 नोव्हेंबर मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू

अहेरी 24 नोव्हेंबर :- राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र, मुंबई यांचे आदेशान्वये दिनांक 17 नोव्हेंबर 2021 अन्वये निधन राजीनामा, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायतीतील रिक्त झालेल्या ग्रामपंचायतमधील आवलमरी (प्रभाग-3), राजाराम (प्रभाग-1,2,3,), पेठा (प्रभाग-1,2,), मरपल्ली (प्रभाग-1,2,), मेडपल्ली (प्रभाग-3), रेपनपल्ली (प्रभाग-5), खमनचेरु (प्रभाग-2,4,), देवलमरी (प्रभाग-3), किष्टापुर वेल,(प्रभाग-1), कमलापूर (प्रभाग-2), पल्ले(प्रभाग-1,3,), येडमपल्ली (प्रभाग-1), किष्टापुर दौड,(प्रभाग-1), व वट्रा खुर्द, (प्रभाग-2), येथील रिक्त सदस्य पदांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपारीक पध्दतीने निवडणूक कार्यक्रम राबविण्यात येणार असून निवडणूकीचे टप्पे व दिनांक पुढील प्रमाणे आहे. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाची अतिरिक्त ठरलेली रिक्त जागा सर्वसाधारण जागा म्हणून अधिसूचित करण्यासाठी पूर्वी सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रसिध्द केलेल्या अंतिम प्रभाग रचनेच्या अधिसुचनेमध्ये सुधारणा करण्याचा दिनांक 22 नोव्हेंबर 2021 (सोमवार) पर्यंत होता, तहसिलदार यांनी  निवडणूकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक 22 नोव्हेंबर 2021 (सोमवार) होता, नामनिर्देशन मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ (मंडळ कार्यालय इमारत तहसिल कार्यालय, अहेरी) दिनांक 30 नोव्हेंबर 2021 (मंगळवार) ते दिनांक 6 डिसेंबर 2021 ( सोमवार) वेळ सकाळी 11.00 ते दु. 3.00 वाजेपर्यत, (दि. 4 व 5 डिसेंबर , 2021 हे सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून) नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ (मंडळ कार्यालय इमारत तहसिल कार्यालय, अहेरी) दिनांक 7 डिसेंबर 2021 (मंगळवार) वेळ सकाळी 11.00 वाजल्यापासून छाननी संपेपर्यत, नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ (मंडळ कार्यालय इमारत तहसिल कार्यालय, अहेरी) दिनांक 9 डिसेंबर 2021 (गुरुवार) दुपारी 3.00 वाजेपर्यंत. निवडणूक चिन्ह नेमुन देणे व निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ दिनांक 9 डिसेंबर 2021 (गुरुवार) दुपारी 3.00 वाजतानंतर. आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक 21 डिसेंबर 2021 (मंगळवार) (सकाळी 7.30 वा. पासून ते दुपारी 3.00 वा. पर्यत) मतमोजणीचा दिनांक 22 डिसेंबर 2021 (बुधवार), जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूककीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक 27 डिसेंबर (सोमवार) पर्यंत राहील. अहेरी तालुक्यातील पोटनिवडणूकांसाठी असलेल्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात दिनांक 17 नोव्हेंबर 2021 चे मध्यरात्रीपासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू झालेली आहे. तरी वरील प्रमाणे निवडणूकीत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून निवडणुक प्रक्रियेस सहकार्य करावे असे आवाहन अहेरी तहसिलदार यांनी केले आहे.