Now Loading

ग्रामीण भागात प्रथमच केज तालुक्यातील मौजे नाव्होली येथे शेतकर्यांचा

ग्रामीण भागात प्रथमच केज तालुक्यातील मौजे नाव्होली येथे शेतकर्यांचा संघर्ष मेळावा,,,,,,,,,,,,,,,,सविस्तर व्रत्त असे की मौजे नाव्होली येथील माउली बळीराजा सामाजिक प्रतिष्ठानच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या विरोधात ग्रामपंचायत च्या प्रांगणात दि ,26 11 2021 पासुन उपोषणाचा मार्ग अवलंबवला आहे. दुसर्या दिवशी अन्नत्याग करण्यात येईल,तिसर्या दिवशी मौन बाळगण्यात येईल,चौथ्या दिवशी शेतकरी मेळावा घेण्यात येईल या मेळाव्यास मा. राजु शेट्टी (माजी क्रषी मंत्री महाराष्ट्र राज्य )यांची प्रमुख उपस्थीती राहणार आहे अशी माहीती श्री सी बी एस ईनामदार (चॉंदसाहेब) यांनी दिली आहे.तरी ही शासनाचे डोळे नाही उघडल्यास व शासनाने लेखी उत्तर न दिल्यास दि,30 11 2021 रोजी ईच्छुक शेतकरी व माऊली बळीराजा प्रतिष्ठाणचे सर्व पदाधिकारी हे ग्रामपंचायत कार्यालय नाव्होली या प्रांगणात आत्मदहन करतील याची शासनाने नोंद घ्यावी .अनेक वेळा शासनाला निवेदणे देऊन शासनाची विनवनी केली परंतु शासनाचे अध्यापही या निकालाकडे दुर्लक्ष आहे .शासन व अधिकारी यांनी मा उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्या आदेशाचा अवमान केला आहे अणि शेतकर्याच्या हक्कावर गदा आणली आहे नाईलाजास्तव सामाजिक प्रतिष्ठाण नाव्होली च्या वतीने पंचक्रषीतील शेतकर्यांना एकत्रीत करुन संघर्ष मेळावा करण्याचे योजीले आहे .