Now Loading

माळेगाव ते लोखंडी रस्ता दुरुस्ती निकृष्ट दर्जाची:-राहुल खोडसे

*माळेगाव ते लोखंडी रस्ता दुरुस्ती निकृष्ट दर्जाची:-राहुल खोडसे* केजः :केज तालुक्यातील कळंब अंबाजोगाई रोडवर माळेगाव ते लोखंडी सावरगाव रस्त्यावर मागील चार वर्षांपासून खड्डे पडलेले होत्या त्यासाठी संभाजी ब्रिगेड तसेच विविध संघटना व स्थानिक च्या नागरिकांतून या रस्त्याच्या दुरुस्ती साठी वेळोवेळी निवेदन आंदोलन मोर्चे काडून मागणी करत होते त्यामुळे आज रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे परंतु गुत्तेदाराच्या आणि संबंधित अधिकारी यांच्या हलगर्जीपणा मुळे खड्डे बुजवण्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याने संभाजी ब्रिगेड तसेच स्थानिक च्या नागरिकांनी एकत्र येत काम बंद करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले हे खर तर हा रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता हेच समजत नाहि खेडेगावातील अनेक तरूण पोटाची खळगी भरन्यासाठी कळंब अंबाजोगाई ला मोठ्या प्रमाणात मोटारसायकल ने जातात व रोज रात्री उशिरापर्यंत गावाकडे येतात यांना अंधारात खड्डे चुकवत गावाकडे यावे लागते या खड्डे चुकवन्याच्या नादात अनेक अपघात झालेले आहेत अनेकजन मृत्यूमुखी पडले तर काही कायमस्वरुपी अपंग होउन बसले . या रस्त्यावरील खड्डे हे अनेक वर्षांपासून जशास तसेच आहेत आज हि हे पॅच अर्धवटच मारले जात आहेत युसुफ वडगाव येथील युवा नेते अमोल पाटील व पैठण चे सरपंच यांनी इशारा दिला होता त्याच अनुषंगाने काल संभाजी ब्रिगेड चे मा.तालुका अध्यक्ष राहुल खोडसे यांनी कामावर भेट दिली असता त्यांना देखिल काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे निदर्शनास आल्या नंतर त्यांनी व अमोल पाटील पत्रकार मनोराम पवार तसेच परिसरातील नागरिकांनी एकत्र येत काम बंद करण्यास भाग पाडले व केज तहसीलदार तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभाग केज यांना निवेदन देण्यात आले यावेळी निवेदनावर संभाजी ब्रिगेड चे राहुल खोडसे, अमोल पाटील,रवी सोमवंशी आदींच्या सह्या आहेत