Now Loading

तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने येडेश्वरी साखर कारखाना मराठवाड्यात नंबर १ चा कारखाना करायचा आहे - बजरंगबप्पा सोनवणे*

*तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने येडेश्वरी साखर कारखाना मराठवाड्यात नंबर १ चा कारखाना करायचा आहे - बजरंगबप्पा सोनवणे* ----------------------------------------------- *येडेश्वरी साखर कारखान्याचा ८ वा गळीत हंगामाचा शुभारंभ संपन्न* केज तालुक्यातील आनंदगाव सा.येथील येथील येडेश्वरी साखर कारखान्याचा सन २०२१-२२ चा आठवा गळीत हंगामाचा शुभारंभ ह.भ.प.श्री.श्रीराम श्रीराम महाराज विडेकर, ह.भ.प.श्री. अर्जुन महाराज लाड, ह.भ.प.श्री. किसान महाराज पवार, ह.भ.प.श्री. महादेव महाराज बोराडे, ह.भ.प.श्री. श्रीकृष्ण महाराज चवार यांच्या शुभआशीर्वादाने व येडेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन बजरंगबप्पा सोनवणे, यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दिनांक १३ नोव्हेंबर रोजी संपन्न झाला. प्रारंभी पारंपरिक पद्धतीने ह.भ.प.श्री.श्रीराम श्रीराम महाराज विडेकर, ह.भ.प.श्री. अर्जुन महाराज लाड, ह.भ.प.श्री.किसन महाराज पवार, ह.भ.प.श्री. महादेव महाराज बोराडे, ह.भ.प.श्री. श्रीकृष्ण महाराज चवार यांच्या हस्ते काटापूजन,गव्हानपूजन करून गव्हाणीत मोळी टाकण्यात आली. यावेळी व्यासपीठावर केज विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे,जिल्हा परिषद अध्यक्षा पती शिवाजी सिरसाट,जेष्ठ नेते नवाब मामू ,सुरेश तात्या पाटील ,जिल्हा परिषद सदस्य शंकर आण्णा उबाळे,बाळासाहेब शेप,रामप्रभू सोळुंके,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कळंब तालुकाध्यक्ष श्रीधर भवर,कारखान्याचे संचालक श्रीकृष्ण भवर ,तालुकाध्यक्ष नंदुदादा मोराळे, युवक तालुकाध्यक्ष मुकुंद कणसे, संजय गांधी निराधार समिती केजचे अध्यक्ष बालासाहेब दादा बोराडे,माजी सभापती अशोक तात्या तारळकर, खरेदी विक्री संघाचे संचालक विलास जोगदंड, अंबाजोगाई नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष बबन भैय्या लोमटे,राष्ट्रवादी महिला काँग्रेस बीड जिल्हाध्यक्षा संगीताताई तूपसागर, हिंदी भाषिक सेलचे जिल्हाध्यक्ष शरीफ सय्यद, केजचे शहराध्यक्ष भाऊसाहेब गुंड, अंबाजोगाई शहराध्यक्ष अलीम सय्यद, केज महिला तालुकाध्यक्षा संजीवनीताई देशमुख , केज शहराध्यक्षा शितलताई लांडगे, तसेच सर्व पंचायत समिती सदस्य,नगरसेवक,चेअरमन,संचालक,ऊस उत्पादक शेतकरी,कर्मचारी, ऊसतोड मजूर व येडेश्वरी परिवारावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे पुष्पगुच्छ,शाल देऊन सत्कार केला तसेच कारखान्याचे काम अगदी कमी वेळात उत्तम पध्द्तीचे केल्याबद्दल एन.आर.फॅब्रिकेशन नगरचे सर्वेसर्वा सातपुते,उल्का इंजिनिअरिंग पुणेचे येरिक्शन मॅनेजर यादव,सदिच्छा कंस्ट्रक्शन लातूर चे सिविल इंजिनिअर इरफान यांचा येडेश्वरी कारखान्याचे चेअरमन बजरंगबप्पा सोनवणे यांच्या सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे संचालक बाळकृष्ण भवर यांनी केले तर माजी आमदार पृथ्वीराज साठे,शंकर आण्णा उबाळे, नारायण आबा शिंदे, यांनी आपल्या भावना व्यक्त करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. येडेश्वरी कारखान्याचे सर्वेसर्वा बजरंगबप्पा सोनवणे यांनी आपल्या भाषणाच्या प्रारंभी कै.कल्याणतात्या शिनगारे यांना अभिवादन केले. दहा वर्षाच्या कार्यकाळात प्रथमच कल्याणतात्या शिनगारे यांच्या गैरहजेरीत गळीत हंगामाचा शुभारंभ होत आहे आठवण कधी जाणार नाही अशी खंत बजरंगबाप्पा सोनवणे यांनी व्यक्त केली. गेल्यावर्षी कारखान्याने ६ लाख ६ हजार जवळपास गाळप करून मागील विक्रम मोडीत काढला.कारखाना ज्यावेळीस उभा केला त्यावेळेस कारखान्याची गाळप क्षमता २५०० मे टन प्रतिदिवस होती. आणि गतवर्षी जास्त पाऊस काळ जास्त झाल्यामुळे उसाचे प्रमाण वाढले आहे हे लक्षात घेता गाळप क्षमता नाही वाढवली तर गाळप करणे कठीण जाईल त्यामुळे आपण कारखान्याचा क्षमता वाढवायचा निर्यण घेतला.आणि आता प्रत्यक्ष २५०० क्षमतेवरून ५००० ते ५५०० क्षमतेने कारखाना ह्या वर्षी नक्की चालेल असे ते म्हनाले .शेतक-यांचा हफ्ता १५ दिवसात जमा करण्याचा प्रयत्न करिन अशी ग्वाही दिली. तसेच सर्व कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.चौधरी सर तर आभार प्रदर्शन अरुण चव्हान यांनी केले.