Now Loading

स्वच्छ भारतासाठी प्रदूषणमुक्त दिवाळीची गरज - डॉ. कराळे

स्वच्छ भारतासाठी प्रदूषणमुक्त दिवाळीची गरज - डॉ. कराळे बीड केज वाढते प्रदूषण आणि त्यामुळे निर्माण होत असलेली अनेक नैसर्गिक संकटे हे थांबवायचे असेल तर प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन डॉ नागेश कराळे यांनी केले . मोठ्या प्रमाणात दिवाळीमध्ये फटाकेच्या माध्यमातून वायुु, जल, जमीन आणि ध्वनी प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होतेे. याचे गंभीर परिणाम पर्यावरणासह मानवाच्या आरोग्यावर होत आहेत. त्यामुळे हे भारतीय सण उत्सव निश्चितपणे आनंदाने साजरी करत असतानां प्रदूषणात वाढ होऊन पर्यावरणाचा ऱ्हास, हानी होणार नाही. याची काळजी घेणे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. भारत देश आजादी का अमृतमहोत्सव साजरा करत असतानां प्रदूषण मुक्त पर्यावरण करून निसर्गाला ही स्वातंत्र्य दिले पाहिजे.        दरवर्षी दिवाळी सणातील फटाक्यांतून लाखो रुपयांचा चुरडा करून आपण या देशाला, समाजाला पर्यायाने निसर्गाला फक्त हानी पोहोचत आहोत. त्याचा ऱ्हास करत आहोत. भारतामध्ये आजही खूप मोठ्या प्रमाणात गरीब व गरजवंत लोक आपले जीवन अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये जगत आहेत. फटाक्यावरील खर्च टाळून आपणही समाजातील गरजवंतानां उपयोगी साहित्य आणि फराळ देऊन त्यांची दिवाळी सुद्धा आपण गोड करू शकतो. यासाठी प्रदूषणमुक्त पण आनंदयुक्त दिवाळी साजरा कराण्याचे आवाहन पर्यावरण प्रेमी डॉ नागेश कराळे यांनी केले आव्हान