Now Loading

पाथरा येथे आधार फाउंडेशन कडुन निराधार, गोरगरिबांची दिवाळी गोड

*पाथरा येथे आधार फाउंडेशन कडुन निराधार, गोरगरिबांची दिवाळी गोड* *घासातला घास देत जपली सामाजिक बांधिलकी* बीड केज तालुक्यातील पाथरा येथील सामाजिक कार्यासाठी ओळख असलेल्या आधार फाउंडेशन ग्रुप कडून निराधार व गोरगरिबांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी किराना साहित्य वाटप करण्यात आले.आपल्या घासातला घास गोर गरिबांनाही मिळावा हा ध्यास मनी बाळगून आधार फाऊंडेशन चे मनोराम पवार यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. गेल्या पाच वर्षापासून पाथरा येथे आधार फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील दानशूर व्यक्तींची मदत घेऊन दिवाळीनिमित्त किराणा किटचे वाटप करण्यात येते.यावर्षी काटे ट्रांसपोर्ट पुणे,(पैठण),मनोराम पवार, गोपाळराव धुमाळ,पंडीत चौरे ,निखिल बचुटे व समाज प्रेमी यांच्या आर्थिक मदतीतून एक घास घासातला या उद्देशाने किराणा साहित्य वाटप करण्यात आले.किराणा साहित्य देण्याचा माणस आधार फाउंडेशन कडून मागील पाच वर्षांपासून अविरत सुरू आहे. यावेळी मनोराम पवार यांनी हे कार्य करत असताना खूप मोठ्या मनाचा मोठेपणा दाखवला असून विविध अडचणीचा सामना करून हे खुप मोठ कार्य करत असल्याचे पत्रकार दत्तात्रय मुजमुले यांनी बोलताना सांगितले त्याचबरोबर या सामाजिक बांधिलकी बाबत सर्वांचे कौतुक केले. यावेळी प्रवीण खोडसे सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार दत्तात्रय मुजमुले,पत्रकार रंजीत घाडगे ,आधार फाऊंडेशन चे सर्वेसर्वा तथा पत्रकार मनोराम पवार, उपसरपंच नानासाहेब पवार,शरद पवार, माजी तंटामुक्ती अध्यक्ष काशिनाथ पवार व किरणा किट लाभधारक गावातील नागरिक उपस्थित होते .